नाशिक : भारतात “रस्त्यातील खड्डे आणि खड्ड्यातील रस्ते”, या मुद्यावरून राजकीय नेते जेव्हा अडचणीत येतात तेव्हा प्रत्येक वेळेला ते रस्ते गुळगुळीत करून देण्याचे आश्वासन देताना हेमामालिनीच्या गालाचे उदाहरण देतात. त्यानंतर देशात त्यावरून गदारोळ होतो आणि नंतर हेच नेते एकमेकांवर गुरकावताना दिसतात. त्यातले ताजे उदाहरण केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलास्ते यांचे घडले आहे.Leaders of all parties speak on Hemamalini’s cheek
मध्य प्रदेश एका कार्यक्रमात बोलताना फग्गन सिंह कुलास्ते यांच्या पुढे रस्त्यांचा प्रश्न मांडण्यात आला. त्या वेळेला तुमच्या गावातले रस्ते मी हेमामालिनीच्या गालासारखे गुळगुळीत करून देतो, असे आश्वासन त्यांनी दिले. हेमामालिनी या भाजपच्या खासदार आहेत. आता आपल्याच खासदाराच्या गालाचे उदाहरण देताना फग्गन सिंह कुलास्ते यांची जीभ अडखळली नाही. उलट, यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थनच केले आहे. मात्र या मुद्द्यावरून त्यांच्यावर जोरदार टीकास्त्रही सोडण्यात येत आहे. भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रवक्त्या चित्र वाघ यांनी फग्गन सिंह कुलास्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करणारी ट्विट केले आहे. यामध्ये पंतप्रधान कार्यालयाला टॅग करण्यात आले आहे.
परंतु भारतात रस्त्यांच्या गुळगुळीत पणाची तुलना हेमामालिनीच्या गालांशी करण्याची “राजकीय परंपरा” फार जुनी आहे. 2016 मध्ये लालूप्रसाद यादव यांनी हेमामालिनीच्या गालांची रस्त्यांशी तुलना केली होती. त्यावर त्यांच्यावर जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव घेतले होते. उत्तर प्रदेशात अटल बिहारी वाजपेयी यांनी हेमामालिनीच्या गालाचा उल्लेख केला होता, असा दावा त्यांनी केला होता.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव मध्ये याच पद्धतीने तुमच्या गावातले रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे गुळगुळीत करून देतो, असे आश्वासन दिले होते. त्यावर तेथील राजकीय वादळ झाले. तेव्हा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव यांच्या वक्तव्याचे समर्थन केले होते. हेमामालिनीच्या गालाची तुलना जर रस्त्यांशी होत असेल तर हा हेमामालिनीचा सन्मान आहे, असा अजब दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर फग्गन सिंह कुलास्ते यांचे वक्तव्य गाजत आहे आणि त्यावरून मोठे वादळी होताना दिसत आहे.
यातून एक बाब स्पष्ट होते नेता कोणत्याही पक्षाचा असो… ते रस्त्यांशी तुलना हेमामालिनीच्या गालाशी करतात आणि नंतर एकमेकांवर गुरकावत बसतात…!!
Leaders of all parties speak on Hemamalini’s cheek
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांनी डिवचले; राऊत (चु*) घसरले; चंद्रकांतदादा संतापले…!!; सोमय्यांनी पुन्हा टोलवले…!!
- कॅनडात अचानक 3 महाविद्यालये बंद, शेकडो भारतीय विद्यार्थी अडकले, भारतीय उच्चायुक्तालयाने जारी केली अॅडव्हायझरी
- Punjab voting : अकाली दल आणि आम आदमी पार्टीचे पंजाब मध्ये नुसत्या बहुमताचे नव्हे, तर थेट लाटांचेच दावे!!
- उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ५९ जागा; ६२७ उमेदवार