• Download App
    युक्रेनमधून सात लाख लोकांचे पलायन; रशियन सैन्याचे सीमेवर शक्तिप्रदर्शन; अण्वस्त्राचा धाक Seven million people flee Ukraine; Demonstrations of Russian troops on the border; Fear of nuclear weapons

    युक्रेनमधून सात लाख लोकांचे पलायन; रशियन सैन्याचे सीमेवर शक्तिप्रदर्शन; अण्वस्त्राचा धाक

    वृत्तसंस्था

    मॉस्को : युक्रेनमधून सात लाख लोकांनी पलायन केले असून रशियन सैन्याने सीमेवर शक्तिप्रदर्शन केले आहे. तसेच अण्वस्त्राचा धाक दाखविण्यास सुरुवात केली आहे. Seven million people flee Ukraine; Demonstrations of Russian troops on the border; Fear of nuclear weapons

    युक्रेनमध्ये आता बॉम्बहल्ल्यांचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत. डोनेस्टक व लुहांस्क प्रांतात रशियन समर्थक फुटीरवादी गटांनी युद्धसदृश स्थिती निर्माण केली आहे. त्यांनी २४ लष्करी चौक्यांवर हल्लेही चढविले आहेत. युक्रेनच्या सैनिकाचा मृत्यू झाला.परिसरातील सुमारे सात लाखांवर लोकांनी पलायन केले आहे. फुटीरवाद्यांनी सर्व माजी सैनिकांची भरती सुरू केली आहे. त्यामुळे रशिया युक्रेनवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिला.

    बायडेन म्हणाले, रशियाने किव्हमधील २८ लाख निर्दोष लोकांचे प्राण संकटात टाकले आहेत. पुतीन यांनी हल्ल्याचा विचार डोक्यातून काढून टाकावा. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस म्युनिचमध्ये म्हणाल्या, रशियाच्या हल्ल्याला चोख उत्तर दिले जाईल. त्यातच शनिवारी रशियाने सरहद्दीवर शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांनी या भागाला भेट देऊन वॉरगेम पाहिले.

    Seven million people flee Ukraine; Demonstrations of Russian troops on the border; Fear of nuclear weapons

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Ukraine : युक्रेनमध्ये जहाजावर हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारताने म्हटले- व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे निंदनीय

    Andy Burnham Sworn : अँडी बर्नहॅम ब्रिटनचे नवे पंतप्रधान; 10 वर्षांत सातवे पंतप्रधान बनले; पाकिस्तानी वंशाच्या शबाना महमूद अर्थमंत्री होऊ शकतात

    Food Delivery : चीनमध्ये फूड डिलिव्हरी बॉयला सर्वात मोठा साहित्यिक सन्मान; जेवण पोहोचवताना अनेक कविता लिहिल्या