• Download App
    लालूप्रसाद यादव यांची चिराग पास्वान यांना बिहारमध्ये तेजस्वी बरोबर राजकीय युतीची ऑफर; पास्वान म्हणाले, "थोडे थांबा" Lalu prasad yadav offered chirag paswan an alliance with RJD in Bihar; chirag responsed "cool"

    लालूप्रसाद यादव यांची चिराग पास्वान यांना बिहारमध्ये तेजस्वी बरोबर राजकीय युतीची ऑफर; पास्वान म्हणाले, “थोडे थांबा”

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळ्यातील शिक्षा भोगलेले नेते लालूप्रसाद यादव सध्या राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले असून त्यांनी काही दिवसांतच दिल्लीत येऊन ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुलायम सिंग यादव यांची सदिच्छा भेट घेतली आहे. त्यांनी या भेटीनंतर राजकीय वक्तव्य देखील करायला सुरुवात केली असून माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पास्वान यांना बिहार मध्ये आपले चिरंजीव तेजस्वी यादव यांच्याशी राजकीय युती करण्याची ऑफर दिली आहे. Lalu prasad yadav offered chirag paswan an alliance with RJD in Bihar; chirag responsed “cool”

    चिराग पास्वान यांनी लालूप्रसाद यांच्या ऑफरला सध्यातरी थंडा प्रतिसाद दिला असून सध्या मी आशीर्वाद यात्रेवर बिहार मध्ये फिरतो आहे. निवडणुकीपूर्वी युतीबाबत निर्णय घेऊ शकेन, असे चिराग पास्वान यांनी स्पष्ट केले आहे.



    लालूप्रसाद यादव बऱ्याच वर्षांनी राजकीयदृष्ट्या सक्रिय झालेले दिसले आहेत. शिक्षक भरती घोटाळ्यात दहा वर्षांची शिक्षा भोगून आलेले हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांच्यासारखी त्यांनी मोदी सरकारवर तोफ डागली नसली तरी बिहारच्या राजकारणात ते पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत.

    त्यातूनच चिराग पास्वान यांना त्यांनी तेजस्वी यादव समवेत युती करण्याची ऑफर दिली आहे. चिराग पास्वान सध्या स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत आहेत. त्यांच्या पक्षाचे ६ खासदार असून त्यापैकी ५ खासदार हे रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू केंद्रीय मंत्री पशुपतिनाथ पारस यांच्यासमवेत चिराग पासवान यांना सोडून गेले आहेत.

    त्यामुळे चिराग पास्वान सध्या लोक जनशक्ती पक्षात एकाकी पडले आहेत. अशा एकाकी पडलेल्या तरुण नेत्याला सहज गळाला लावता येईल, असा लालूप्रसाद यांचा होरा होता. परंतु सध्या तरी चिराग पासवान यांनी त्यांना थंडा प्रतिसाद देऊन आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई ते स्वतःच लढण्याचा इरादा त्यांनी जाहीर केला आहे.

    Lalu prasad yadav offered chirag paswan an alliance with RJD in Bihar; chirag responsed “cool”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…