• Download App
    कर्नाटक विधानसभेत गोहत्याविरोधी आणि गोपालन बिल मंजूर | The Focus India

    कर्नाटक विधानसभेत गोहत्याविरोधी आणि गोपालन बिल मंजूर

    वृत्तसंस्था

    बेंगळुरू : कर्नाटक विधानसभेने गोहत्याविरोधी आणि गोपालन विधेयक २०२० आज विधानसभेत बहुमताने मंजूर केले. राज्याच्या येडीयुरप्पा सरकारने हे विधेयक मांडले होते. राज्याचे पशुपालनमंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी ही माहिती दिली.

    गाय, गोवंश, गोऱ्हा यांची कत्तल आणि हत्या गुन्हा ठरविण्यात आली असून त्यासाठी शिक्षेच्या वेगवेगळ्या तरतुदी कायद्यात करण्यात आल्या आहेत. गाय आणि गोवंशाची अवैध वाहतूक, त्यांची कत्तल आणि कोणत्याही कारणासाठी हत्या, गोमांसाची विक्री आदी गुन्ह्यांसाठीही वेगवेगळ्या शिक्षेच्या तरतुदी या कायद्यात करण्यात आल्याची माहिती मधुस्वामी यांनी दिली.

    गायीला अथवा गोवंशाला वांशिक आणि संसर्गजन्य आजार झाला असेल तर डॉक्टरांच्या परवानगीने त्याची विल्हेवाट लावता येईल. परंतु, कोणत्याही स्थितीत कसायाला विकता येणार नाही किंवा त्यांच्या कत्तलीला परवानगी देण्यात येणार नाही, अशी तरतूदी कायद्यात करण्यात आली आहे.

    १३ वर्षे वया वरील म्हैस अथवा रेडा यांच्या हत्येला परवानगी देण्यात आली आहे. परंतु, त्यांचे वैद्यकीय तपासणी नियम कडक करण्यात आले आहेत.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…