• Download App
    कर्नाटकात कॉंग्रेससोबत जाऊन जनतेची सहानुभूती गमावून बसलो, एच. डी. कुमारस्वामी यांची कबुली | The Focus India

    कर्नाटकात कॉंग्रेससोबत जाऊन जनतेची सहानुभूती गमावून बसलो, एच. डी. कुमारस्वामी यांची कबुली

    कर्नाटकात कॉंग्रेसच्या हातात हात घालून सरकार बनविल्यामुळे जनतेची सहानुभूती गमावून बसलो. राज्यातील जनतेच्या मनात १२ वर्षांपासून निर्माण केलेल्या विश्वासाला तडा गेला, असे प्रतिपादन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे नेते एच. डी . कुमारस्वामी यांनी केले आहे.


    वृत्तसंस्था

    बंगळुरू : कर्नाटकात कॉंग्रेसच्या हातात हात घालून सरकार बनविल्यामुळे जनतेची सहानुभूती गमावून बसलो. राज्यातील जनतेच्या मनात १२ वर्षांपासून निर्माण केलेल्या विश्वासाला तडा गेला, असे प्रतिपादन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केले आहे. karnataka congress with HD kumarswamy

    कॉंग्रेसचे नेते सिध्दरामय्या यांनी मोठे षडयंत्र करून लावलेल्या जाळ्यात आपण फसले गेलो. अगदी भारतीय जनता पक्षानेही आपला इतका विश्वासघात केला नव्हता, अशी कबुली कुमारस्वामी यांनी दिली. karnataka congress with HD kumarswamy

    karnataka congress with HD kumarswamy

    सिध्दरामय्या यांच्यावर टीका करताना कुमारस्वामी म्हणाले ते खोटे बोलण्यात पटाईत असून मगरीचे अश्रू ढाळणारे आहेत. त्यांच्यामुळेच कर्नाटकातील जनतेचा विश्वासघात झाला. २००६ मध्ये मुख्यमंत्री म्हणून मी जनतेचा विश्वास संपादन केला होता. बारा वर्षे हा विश्वास कायम होता.

    परंतु, कॉंग्रेससोबत गेलो आणि सगळेच गमावून बसलो. कुमारस्वामी म्हणाले, कॉंग्रेससोबत युती करणेच चुकीचे होते. कारण निवडणूक प्रचारात कॉंग्रेसने भाजपाची बी टीम म्हणून जनता दलाची बदनामी केली होती.

    परंतु, पक्षाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या आग्रहामुळे ही युती झाली. परंतु, त्यामुळे पक्षाची ताकद कमी होत चालली आहे. देवेगौडा यांच्या भावनिक आवाहनाला आपण बळी पडलो. त्यामुळे एकेकाळी राज्यात एकट्याच्या बळावर २८ ते ४० जागा जिंकणाऱ्या जनता दलाची ताकद कमी होत चालली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कॉंग्रेससोबत केलेली युतीच आहे.

    कर्नाटकात कॉंग्रेससोबत जाऊन जनतेची सहानुभूती गमावून बसलो, एच. डी. कुमारस्वामी यांची कबुली

    कर्नाटकात २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस आणि जनता दल एकत्र आले. कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले. परंतु, स्थापनेपासूनच सरकार अंतर्गत कुरबुरींमुळे अस्थिर राहिले. कॉंग्रेस आणि जनता दलाच्या काही आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे हे सरकार पडले. मात्र, त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची वाताहत झाली.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…