इस्त्राएलची स्थापना अगदी योग्य रितीने झाली. माझ्याबद्दल बोलला तर नागडं करेल, असा इशारा प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटने दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : इस्त्राएलची स्थापना अगदी योग्य रितीने झाली. माझ्याबद्दल बोलला तर नागडं करेल, असा इशारा प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटने दिला आहे. Kangna Ranot warned trollers
कंगनाने नुकतीच इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती म्हणाली, तुम्ही सर्व व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहू शकता की इस्त्रायलची स्थापना अगदी योग्यरीत्या झाली आहे. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवत त्यांनी युनायटेड नेशनच्या मदतीने या देशाची स्थापना केली आहे.
सहा मुसलमान देशांनी त्यांच्यावर आक्रमण केली. या आक्रमणामध्ये प्रत्येक वेळी त्यांनी देशाच्या विविध भागावर ताबा मिळवला. अर्थातच जेव्हा तुम्ही युद्ध जिंकता तेव्हा असंच होतं. जे लोक रडत आहेत आणि म्हणत आहेत की मला काही माहीत नाही, तर बाळांनो मी सर्वांची आई आहे. त्यामुळे यापुढे लायकीत रहा.
इस्त्राएलबाबतच्या कंगनाच्या ज्ञानावर काहींनी शंका व्यक्त केली. यावर कंगनाने दुसरी पोस्ट टाकून ट्रोलर्सना चांगलेच झापले आहे. यामध्ये कंगना म्हणते, तुम्ही असं कसं इस्त्रायलला बेकायदेशीर म्हणू शकता. या जगात त्यांचं स्थान नाही का? सर्व जगाला मूर्ख बनवून ठेवलंय.
फक्त गुंडगिरी करायची आणि समोरून कुणी केली तर मात्र रडून गोंधळ घालायचा. संपूर्ण जगाला डोक्यावर घ्यायचे. मूर्ख लोकांचा आणि मीडियाचा वापर करून गोंधळ निर्माण करायचा. जरा लाज बाळगा संपूर्ण जगासमोर तुमचा पदार्फाश झाला आहे आणि माझ्याबद्दल जर बोलाल तर नागडं करून टाकेन.
Kangna Ranot warned trollers
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : चक्रीवादळ तौकतेच्या मार्गात ओएनजीसीची बोट अडकली, 273 जणांच्या बचावासाठी भारतीय नौसेनेची दोन जहाजे रवाना
- मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने जिंकला Miss Universe 2021चा किताब, मिस इंडिया एडलिना कॅसलिनो टॉप फाइव्हमध्ये
- मध्य प्रदेशात लॉकडाऊनचे नियम मोडल्यास ‘राम नाम’ लिहिण्याची अनोखी शिक्षा
- औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कोरोनावर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रस्ताव, डॉक्टरांच्या मदतीसाठी तयार होईल मनुष्यबळ
- DRDOने तयार केलेले अँटी कोरोना औषध 2DG लॉन्च; रिकव्हरी होणार फास्ट, ऑक्सिजनची गरजही कमी