• Download App
    ममतांच्या राज्यातील सहिष्णुता, गुंडगिरीवर लिबरल्स मूग गिळून गप्प | The Focus India

    ममतांच्या राज्यातील सहिष्णुता, गुंडगिरीवर लिबरल्स मूग गिळून गप्प

    • नड्डांच्या ताफ्यावरील हल्ल्याचा विरोधकांकडून अद्याप निषेध नाही

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे दिसायला लागली. ममतांच्या तथाकथित लोकशाहीवादी कारभाराचा विद्रूप चेहरा समोर आला तरी, काँग्रेसी, डावे लिबरल्स याबद्दल मूग गिळून गप्प आहेत. jp nadda and kailash vijayvargiya says

    दिल्लीतील शेतकरी आंदोलनात शिरकाव करून त्यांच्या आंदोलनाच्या धगीवर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा काँग्रेससह विरोधकांचा डाव आहे. पण भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या गाडीवर हल्ला झाल्याच्या बातम्या येऊन आणि व्हिडिओ व्हायरल होऊनही कोणाही विरोधी नेत्याची अथवा लिबरल्सची प्रतिक्रिया आलेली नाही. एरवी देशातील लोकशाहीच्या आणि तथाकथित असहिष्णुतेच्या नावाने गळा काढणारे बॉलिवूडचे लिबरल, शाहीनबाग, शेतकरी आंदोलनात घुसणारे त्यांचे नेते, जेएनयूचे विद्यार्थी नेते तोंडातून एक चकार शब्द काढायला तयार नाहीत.



    नड्डांचा तेथील कार्यक्रम राजकीय होताच पण तो शांततामय मार्गाने सुरू होता. एक राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना तो अधिकार आहे. पण त्या अधिकारातच बंगालचा दौरा करताना त्यांना तृणमूळच्या गुंडांच्या दगडफेकीला सामोरे जावे लागले. यावर सर्व विरोधक गप्प आहेत. या विरोधकांनीच मोदी सरकारच्या काळात असहिष्णुता माजल्याचा कांगावा केला होता. त्यांना आत्ता बंगालमध्ये ममतांच्या राज्यातील असहिष्णुता आणि गुंडगिरी दिसली नाही.

    या हल्ल्यात कैलाश विजयवर्गीय आणि मुकूल रॉय जखमी झाले आहेत. नड्डांच्या सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या दौऱ्यात किती तुटपूंजा पोलिस बंदोबस्त होता, हे विडिओमध्ये स्पष्ट दिसते आहे. गुंडांची दगडफेख आणि लाठीमारी तसेच पोलिस काही कारवाई करत नसल्याचेही स्पष्ट दिसते आहे.

    jp nadda and kailash vijayvargiya says

    तरीही काँग्रेससह विरोधी पक्ष यावर काही बोलायला तयार नाही. तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी उलटा भाजपवर हिंसाचार घडविल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र यासंबंधी अहवाल मागवला आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…