एकदा आपण लोकशाही, स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता, निधर्मीवाद मतस्वातंत्र्य, न्याय या संकल्पना एखाद्याच्या भाषणात वारंवार ऐकू लागलो की समजावे ते बोलणारा खूप मोठा विचारवंत आहे किंबहुना असा विचारवंत झाल्याखेरीज हे शब्दच तोंडात वारंवार घोळत नाहीत…!! हे शब्द वारंवार तोंडात घोळणे हेच भारतात फार मोठा लिबरल विचारवंत असल्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे…!!Jamiai “one term” thinking in the democratic veil
आणि एकदा आपण असे विचारवंत झालो की मग लोकशाहीच्या बुरख्याखाली आपण आपले कोणतेही विचार व्यवस्थित दडपून देऊ शकतो असा “कॉन्फिडन्स” येतो. मग त्यासाठी व्यासपीठ कोणतेही असो, त्या व्यासपीठावरून धर्मांध, जातीयवादी, व्यक्तिकेंद्री, एकारलेली विचारसरणी वगैरे शब्दांच्या फैरी समोरच्यावर बेछूट झाङता येतात…!! या फैरींनी तो गारद झाला आहे का नाही हे महत्वाचे नाही, पण विचारवंत म्हणून आपल्याला मात्र जरूर धन्यता वाटत राहते…!! आपले विचार ऐकणारे ची स्वतःला धन्य-धन्य म्हणत राहतात…!!
असेच काहीसे एका फार मोठ्या विचारवंतांचे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या व्यासपीठावरून झाले आहे. अरुंधती रॉय या विचारवंत लेखिकेचे नाव आहे. त्यांना “छोट्या गोष्टींचा देव” असे पुस्तक लिहिल्याबद्दल मोठे बुकर पारितोषिक मिळाले आहे. अर्थात त्यामुळे त्यांच्या विचारवंत या दर्जावर शिक्कामोर्तब झालेले नाही, तर त्यांच्या आधुनिक लोकशाही व्यवस्थेविषयी, स्वातंत्र्य, समतेविषयी, धर्मनिरपेक्षते विषयी मांडलेल्या विचारातून आणि काश्मीरवर भारताने कब्जा केला आहे, वगैरे मुक्ताफळांमधून त्यांच्या “विचारवंत” या दर्जावर शिक्कामोर्तब झाले आहे. जामिया मिलिया इस्लामिया यासारख्या व्यासपीठावर जाऊन तर त्यांची “विचारवंत” ही ओळख अधिकच गहिरी झाली आहे…!!
मग तेथे लोकशाही विषयक चिंतन करून एका व्यक्तीला एकच टर्म पंतप्रधानपद मिळाले पाहिजे, असे विचार सुचले आहेत. या आधीची 70 वर्षे, 50 वर्षे, 30 वर्षे, 20 वर्षे हा विचार त्यांना अथवा त्यांच्या सारख्या विचारवंतांना का सुचला नाही? हे बाकीच्यांनी त्यांना विचारण्याचे कारण उरत नाही. कारण ते सगळे लोक धर्मांध, जातीयवादी, बहुलतावादी वगैरे आहेत…!!
लोकशाहीशी त्यांना काही देणेघेणे नाही. ते दोन वेळा लोकसभेत बहुमत मिळवून निवडून आले असले म्हणून काय झाले?? ते थोडेच खरे लोकशाहीवादी आहेत?? ते तर आपली धर्मांध विचारसरणी देशावर लादू इच्छिणारे लोक आहेत. त्यामुळे मूळातच या विचारवंतांना कोणते प्रश्न विचारण्याचे यांना अधिकारच उरत नाहीत…!!
अर्थात या विचारवंतांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते उगाच ट्रिपल तलाक, मुलींचे वय लग्नाचे वय 18 वरून 21 करणे या “फालतू” विषयांवर विचार करत नाहीत आणि आपले विचार मांडण्याच्या फंदात पडत नाहीत. अर्थात “हे विचारवंत” त्या विषयांवर विचारच मांडत नसल्यामुळे ते विषय “फालतू” आहेत, हे उघड आहे. कारण विचारवंतांनी मांडलेले विषयच हे कायम उच्च दर्जाचे असतात. इतरांनी मांडलेले विषय आणि विचार हे निम्न दर्जाचे असतात.
त्यामुळे अर्थातच ट्रिपल तलाक, मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 करणे हे विषय निम्न दर्जाचे ठरले आहेत. कारण ते मांडणारे लोक धर्मांध, जातीयवादी, बहुलतावादी वगैरे आहेत. शिवाय हे विषय मांडण्यासाठी त्यांनी कधी शाहीन बागेचे व्यासपीठ वापरले नाही की ते कधी जामिया मिलिया मध्ये गेले नाहीत. त्यामुळे अर्थातच “विचारवंत” या निकषांमध्ये ते बसतच नाहीत.
लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या संकल्पनांचा वाराही त्यांना लागलेला नाही. मात्र या संकल्पनांचा “वारा पिऊन” बेहोश झाल्यानंतरच “विचारवंत” या दर्जापर्यंत पोहोचता येते, हा भारतातल्या लिबरल उच्च परंपरेचा पाईक होण्याचा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. तो काही निवडक विचारवंतांनाच पार करता येतो आणि मगच लोकशाहीच्या बुरख्यातले जामियायी विचार सुचतात…!!… एरवी हे काही येरागबाळ्याचे काम नोहे…!!
Jamiai “one term” thinking in the democratic veil
महत्त्वाच्या बातम्या
- OMICRON : युरोपात कोरोनाचा कहर ; इंग्लंडमध्ये एका दिवसांत 88 हजार
- तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम, माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित असल्याचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले
- अभिनेत्री अलिया भट्टवर होणार कारवाई, हाय रिस्क संपर्कात येऊनही होम क्वारंटाईनचा भंग
- विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड ठाकरे सरकारचे लक्ष्य, आता कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरविणार, आशिष शेलार यांचा आरोप
- काका- पुतण्याची युती, मात्र स्वत;च्या पक्षांची ओळख कायम ठेऊन सोबत लढणार