• Download App
    जय श्रीराम नाहीत बंगाली संस्कृतीचा भाग; अमर्त्य सेन यांनी तोडले तारे; प्रांतवादाला खतपाणी | The Focus India

    जय श्रीराम नाहीत बंगाली संस्कृतीचा भाग; अमर्त्य सेन यांनी तोडले तारे; प्रांतवादाला खतपाणी

    • रामनवमीला नको तेवढी प्रसिद्धी दिली जात असल्याचा कंगावाह

    वृत्तसंस्था

    कोलकत्ता : जय श्री राम, ही घोषणा बंगाली संस्कृतीचा भाग नाही, असे तारे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी तोडले असून नव्या वादाला तोंड फोडले आहे. जागतिक दर्जाच्या या अर्थतज्ञाच्या वक्तव्यामुळे एकप्रकारे प्रांतवादाला खतपाणी घातले गेले आहे. jai shriram is not part of bengali culture, says amartya sen

    जाधवपूर विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही प्रांतवादी भाषा वापरली आहे. रामनवमीला नको तेवढी प्रसिद्धी दिली जात असल्याचा कंगावाही यांनी केला. दुर्गा ही बंगालच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून जय श्रीराम नाही, असे सांगताना ते म्हणाले, जय श्रीराम घोषणा करून लोकांना बदडण्याचे काम केले जात आहे. jai shriram is not part of bengali culture, says amartya sen

    “दुर्गा, जय श्रीराम हे बंगाली संस्कृतीचा भाग नाहीत”, हे अमर्त्य सेन यांचे वक्तव्य कोणाचा लाभ राजकीय करून देणार?


    दुर्गा आणि श्रीराम हे तमाम हिंदूंची श्रद्धास्थाने आहेत. त्यात त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. पण, काही तथाकथित बुद्धिजीवी आणि पढतमूर्ख हा भेद करत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

    jai shriram is not part of bengali culture, says amartya sen

    ते म्हणाले की माझ्या चार वर्षाच्या नातील मी विचारले की, तुझी आवडती देवता कोणती ? त्यावर ती म्हणाली, माँ दुर्गा. त्यामुळे माँ दुर्गा ही बंगाली संस्कृतीचा भाग आहे. अन्य कोणी नाही. जय श्रीराम न म्हटल्यास मारहाण केल्याचा काही घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर या घोषणेचा वापर मारहाण करण्यासाठीच जणू केला जातो, असा गैरसमज सेन यांनी करवून दिला आहे.

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!