वृत्तसंस्था
न्यूयॉर्क – अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यानंतर वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा दहशतवादाची, हिंसक राष्ट्रवाद, उजव्या विचारसरणीचा कट्टरतावाद अशा विविध प्रकारे व्याख्या करण्याचा प्रयत्न होत असल्याचा इशारा भारताने जगाला दिला. ‘तुमचे दहशतवादी आणि आमचे दहशतवादी’ असे समजण्याच्या काळाकडे आपण पुन्हा जाणे योग्य नाही, दहशतवाद्यांचा एकत्रितपणे सामना करायला हवा, असे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये केले. India warns world on terrorisam
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी भारताची भूमिका मांडली. ‘‘दहशतवादाचा सर्व जगाला धोका असल्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्य केले आहे. सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न केले तरच या संकटाचा सामना करता येईल.
एखाद्या देशातील दहशतवादाचा जगाच्या दुसऱ्या भागात असलेल्या देशावरही परिणाम होऊ शकतो, हे जगाने ९/११ च्या हल्ल्यानंतर मान्य केले होते आणि त्याच वेळी आपण सर्व जण एकत्र आलो होतो. या हल्ल्यापूर्वी ‘तुमचे दहशतवादी आणि आमचे दहशतवादी’ यात जग विभागले गेले होते. आता दोन दशकांनंतर पुन्हा एकदा अशीच विभागणी करण्याचे प्रयत्न होत असून यासाठी वंशवाद, राष्ट्रवाद, कट्टरतावाद अशा शब्दांचा आश्रय घेतला जात आहे.
India warns world on terrorisam
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडचा व्लॉगर कार्ल रॉक भारतात ब्लॅकलिस्ट, Visa नियमांच्या उल्लंघनाचा आरोप
- केजरीवाल सरकारने DTC बसेसच्या खरेदीत केला 3500 कोटींचा घोटाळा, भाजप आरोपांवर उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले- आश्चर्य वाटतंय!
- 36 लाख दूध उत्पादकांच्या ‘अमूल’ने केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या निर्मितीवर मानले आभार, आणखी एका सहकार क्रांतीचे केले स्वागत
- चीनचा नवा डाव : जेनेटिक इंजिनिअरिंगने सैनिकांना शक्तिशाली बनवत आहे ड्रॅगन, अमेरिकाही चिंतित