• Download App
    INDIA-POLAND : जगाने नाकारलं मात्र भारताने स्वीकारलं ! पोलंडला राजाश्रय देणारं संस्थान कोल्हापूर ! दुसऱ्या महायुद्धात पाच हजार पोलंडवासीय पाच वर्ष कोल्हापूरमध्ये..INDIA-POLAND: The world rejected but India accepted! Kolhapur is an institution that gives sanctuary to Poland! Five thousand Poles in Kolhapur for five years during the Second World War

    INDIA-POLAND : जगाने नाकारलं मात्र भारताने स्वीकारलं ! पोलंडला राजाश्रय देणारं संस्थान कोल्हापूर ! दुसऱ्या महायुद्धात पोलंडवासीय पाच वर्ष कोल्हापूरात… गातात वंदे मातरम्

    ‘जर्मनी आणि रशियाकडून पोलंड बेचिराख होत असताना आमच्या पाच हजार नागरिकांना कोल्हापूर संस्थानाने आश्रय दिला. पोलीश नागरिकांसाठी संस्थानाने मानवतावादी भूमिकेतून मदत केली. त्याचे ऋण फेडू शकत नाही.


    राजाश्रय देणारं संस्थान म्हणून कोल्हापूर संस्थानाची देशातच नाही तर जगात ओळख आहे. त्याचं कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान पोलंडचे नागरिक जगभर आश्रय मागत होते, कोणीही त्यांना आश्रय द्यायला तयार नव्हते. त्यावेळी पोलंडच्या पाच हजार नागरिकांना कोल्हापुरात आश्रय दिला गेला.


    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर :गोष्ट दुसऱ्या महायुद्धातील. हिटलरने पोलंडवासीय ‘ज्यू’नागरिकांचा अमानुष नरसंहार सुरु केल्याने त्यांच्यावर ‘दे माय  धरणीठाय’ अशी अवस्था ओढवली होती. जगातील अनेक देशांनी  निर्वासित पोलंडवासीयांसाठी आश्रयाचे दरवाजे बंद केले असताना हिंदुस्थातील दोन संस्थानांनी ज्यूंना आपल्या पदरात घेतले. ही संस्थाने होती कोल्हापूर आणि जामनगर. आज इतक्या वर्षांनंतरही करवीर नगरी आणि पोलंडवासीयांचे दृढ संबंध आहेत…ते वंदे मातरम् देखील आत्मीयतेने गातात…

    ही तर ऋणांची परतफेड …युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी पोलंड देश पुढे सरसावला आहे. पोलंडकडून भारतीय नागरिकांना सर्व प्रकारची मदत करण्यात येत आहे.मात्र या निमित्ताने दुसऱ्या महायुद्धात भारतीयांनी पोलंडच्या नागरिकांना केलेल्या मदतीची आठवण होत आहे. पोलंडमधील नागरिकांना कोल्हापूर संस्थानाने मदत केली होती. साधारण पाच हजाराहून जास्त नागरिकांना कोल्हापूर संस्थानाने आश्रय दिला होता. त्यावेळेपासून आजतागायत कोल्हापूर आणि पोलंडचे संबंध आहेत.

    पोलंडवासी आणि कोल्हापूरच नातं दुसऱ्या महायुद्धपासूनच आहे. हिटलरच्या छळाला कंटाळून पोलंडचे नागरिक आश्रय शोधत होते. त्या वेळी केवळ कोल्हापूर आणि जामनगर संस्थानांनी यांना आश्रय दिला. 1943 ते 1948 दरम्यान कोल्हापूरच्या वळीवडे या ठिकाणी शहाजी महाराज यांनी पोलंडच्या नागरिकांसाठी वसाहत उभा केली. त्यामुळेच गेली 80 वर्षे पोलंडचे नागरिक कोल्हापूर संस्थानाचे ऋण व्यक्त करत आहेत.INDIA-POLAND: The world rejected but India accepted! Kolhapur is an institution that gives sanctuary to Poland! Five thousand Poles in Kolhapur for five years during the Second World War



    वळीवडे येथील छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाचे अनावरण कार्यकमात पोलंडचे उप परराष्ट्र मंत्री मार्सीन प्रीझीदॅज, खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे, खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पोलंडचे राजदूत ॲडम बूरॉकोस्की, पोलिश एअरलाईनचे अध्यक्ष मिल्झाक्झार्स्की, कौन्सुल जनरल डॅमियन आयर्झीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह वळीवडेत वास्तव्य केलेले पोलिस नागरिक व त्यांचे नातेवाईक.


    काय म्हणाले होते पोलंडचे पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रिझीदॅज…

    जर्मनी आणि रशियाकडून पोलंड बेचिराख होत असताना आमच्या पाच हजार नागरिकांना कोल्हापूर संस्थानाने आश्रय दिला. पोलीश नागरिकांसाठी संस्थानाने मानवतावादी भूमिकेतून मदत केली. त्याचे ऋण फेडू शकत नाही. ८० वर्षांनंतरही कोल्हापुरातील वळिवडे गावाविषयीच्या आमच्या भावना कायम आहेत. प्रेम, मैत्री, मानवतेचा सेतू कायम रहावा,’ अशी भावना पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रिझीदॅज यांनी व्यक्त केली. वळिवडे येथील छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाचे अनावरण प्रिझीदॅज यांच्या हस्ते करण्यात आले होते.


    ज्या पाच वर्षात पोलंडचे नागरिक कोल्हापूरमध्ये राहिले होते त्यावेळी त्यांनी काही नाते संबंध निर्माण केले होते. कोल्हापूरने नेहमीचं गरजूंना आपल्या पदरात घेतलंय. ज्या वेळी संपूर्ण जगाने पोलंडला नाकारलं होतं त्यावेळी कोल्हापूर संस्थानाने पोलंडच्या नागरिकांना आश्रय दिला.

    जगभरात युद्धज्वर शिगेला पोचला असताना या छावणीत दहा हजार पोलिश ‘ज्यू’ नागरिक अत्यंत गुण्यागोविंदाने रहात होते. कित्येकांचे बालपण तर इथे गेले, पण कित्येकांची जन्मभूमीही हीच छावणी ठरली ! यातून  कोल्हापूरच्या वळिवडे छावणीबरोबर या पोलिश नागरिकांचे भावनिक नाते जडले आहे. येथे जन्मलेली पोलिश मुले ‘वळिवडे कॅम्प’  ही आमची पहिली जन्मभूमी आहे, अशा भावना व्यक्त करतात.

    दुसऱ्या महायुद्धामध्ये पोलंड वासीयांना कोल्हापूरकरांनी आश्रय दिला होता. यातील काही नागरिकांनी कोल्हापूरला भेट देऊन आपल्या आठवणी जागृत केल्या होत्या.

    INDIA-POLAND: The world rejected but India accepted! Kolhapur is an institution that gives sanctuary to Poland! Five thousand Poles in Kolhapur for five years during the Second World War

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य