• Download App
    Nawab Malik ED : नवाब मलिक यांचा मुलगा फराजच्या कंपनीचा बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये 200 कोटींचा भूखंड; ईडीकडून चौकशी!!| Nawab Malik ED: 200 crore plot in Bandra-Kurla complex of Faraz's company, son of Nawab Malik; Inquiry from ED

    Nawab Malik ED : नवाब मलिक यांचा मुलगा फराजच्या कंपनीचा बांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये 200 कोटींचा भूखंड; ईडीकडून चौकशी!!

    प्रतिनिधी

    मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने चौकशी आणि तपास यांचा फास अधिकच घट्ट करण्यास सुरुवात केली आहे.Nawab Malik ED: 200 crore plot in Bandra-Kurla complex of Faraz’s company, son of Nawab Malik; Inquiry from ED

    ईडीच्या तपासात नवाब मलिक यांच्या नावे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बिकेसी येथील आणखी एक भूखंड समोर आला आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबाचा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सुमारे २०० कोटी रुपये किमतीचा भूखंड असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे.



    मलिक यांचा मुलगा फराज याच्याकडे टचवुड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची २५ % भागीदारी असून हा भूखंड त्यांच्याच मालकीचा आहे. हा भूखंड २००६ मध्ये खरेदी केला होता आणि त्याचा तिप्पट मोबदला देण्यात आल्याचे ईडीला आढळून आले आहे. ईडीचे अधिकारी या भूखंडाच्या व्यवहाराशी संबंधित लोकांची चौकशी करत आहे.

    फराज मलिकच्या अडचणीत वाढ

    कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांचा मुलगा फराज मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. ईडीने फराज यांना समन्स बजावले असून चौकशीसाठी बोलावले आहे.

    त्यानंतर फराज मलिक यांच्या वकिलांनी ईडीकडे संबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी आठवड्याचा वेळ मागितला होता. मात्र, ईडीने त्यांची विनंती फेटाळून लावल्यामुळे फराज मलिक यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

    या याचिकेवर लवकरच होणार सुनावणी 

    ईडीने दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक केली असून सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. प्रकृती बिघडल्यामुळे मलिक यांना काही काळ रुग्णालयात दाखल केले होते. मलिक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची रवानगी पुन्हा ईडी कोठडीत करण्यात आली आहे. दुसरीकडे मलिक यांनी ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    ईडीने दाखल केलेला इसीआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. ईडीकडून झालेली अटक बेकायदा असून राजकीय सूडापोटी ही कारवाई केली आहे, असा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. परंतु, हायकोर्टाने मलिक यांची मागणी मान्य केली नाही. याबाबतची सुनावणी पुढच्या सोमवारी घेण्यात येणार आहे. उद्या बुधवारी मलिक यांची ईडी कोठडीची मुदत संपत असून त्यांना बुधवारी दुपारी विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

    Nawab Malik ED: 200 crore plot in Bandra-Kurla complex of Faraz’s company, son of Nawab Malik; Inquiry from ED

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांच्या माढा मोहिमेनंतर फडणवीसांची स्वारी; फेरमांडणी करून “मोदी है तो मुमकिन है” ची कसून पूर्वतयारी!!

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता