वृत्तसंस्था
नवी दिल्ली : टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने ब्रॉन्झ पदक पटकावल्याचा आनंद अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी खास संत्र्याची मिठाई वाटून साजरा केला.
ऑलम्पिकमध्ये भारताला तब्बल 41 वर्षानंतर हॉकीत पदक प्राप्त झाले आहे. भारताने जर्मनीला 5- 4 अशा अशा तुल्यबळ लढतीत हरवून विजय संपादन केला.
याअगोदर, भारताने वासुदेवन भास्करन यांच्या नेतृत्वाखाली १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 41 वर्षांनी भारताला पदक मिळाल्याचा आनंद नवनीत राणा यांनी संत्र्याची मिठाई वाटून व्यक्त केला.
- खासदार नवनीत राणांनी वाटली संत्र्याची मिठाई
- ऑलम्पिक भारताला 41 वर्षानंतर हॉकीत पदक
- भारताने जर्मनीला 5- 4 अशा फरकाने हरविले
- १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक