• Download App
    तालिबानी राजवटीसोबतच ड्रॅगनच्या विस्तारवादालाही फुटले पंख, अफगाणी बाजारपेठेत माल उतरवण्याची आणि मोठे प्रकल्प उभारण्याची तयारी । In Taliban Governance China is increasing economic power by starting big projects in Afghanistan

    तालिबानी राजवटीसोबतच ड्रॅगनच्या विस्तारवादालाही फुटले पंख, अफगाणी बाजारपेठेत माल उतरवण्याची आणि मोठे प्रकल्प उभारण्याची तयारी

    China is increasing economic power : पाकिस्तान आधीच चीनच्या ताब्यात आला आहे, यामुळे चीनला थेट ग्वादर बंदरापर्यंत पोहोच मिळाली आहे. त्याचबरोबर चीनच्या बीआरआय प्रकल्पासाठी अफगाणिस्तान हा एक महत्त्वाचा देश राहिला आहे. अफगाणिस्तान हा बीआरआयचा औपचारिक सदस्यही आहे, परंतु त्याने चीनच्या या प्रकल्पाला हिरवा कंदिल दिला नाही. आता अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याची माघार आणि तालिबानच्या कब्जानंतर चीनने आपल्या विस्तारवादी धोरणावर काम करण्यास सुरुवात केली आहे. In Taliban Governance China is increasing economic power by starting big projects in Afghanistan


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकिस्तान आधीच चीनच्या ताब्यात आला आहे, यामुळे चीनला थेट ग्वादर बंदरापर्यंत पोहोच मिळाली आहे. त्याचबरोबर चीनच्या बीआरआय प्रकल्पासाठी अफगाणिस्तान हा एक महत्त्वाचा देश राहिला आहे. अफगाणिस्तान हा बीआरआयचा औपचारिक सदस्यही आहे, परंतु त्याने चीनच्या या प्रकल्पाला हिरवा कंदिल दिला नाही. आता अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याची माघार आणि तालिबानच्या कब्जानंतर चीनने आपल्या विस्तारवादी धोरणावर काम करण्यास सुरुवात केली आहे.

    चीन अफगाणिस्तानमधील आपला बीआरआय प्रकल्प पुन्हा सक्रिय करत आहे आणि त्यासाठी ते पेशावर ते काबूल या हायस्पीड मोटरवेचे नियोजन पुढे नेत आहे. पाकिस्तानचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक N5 इस्लामाबादमार्गे पेशावरला जातो आणि नंतर अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा खैबर खिंडजवळील लुंडी कोटलला जातो. यानंतर अफगाणिस्तानचा AH76 महामार्ग जो थेट काबूलला जातो. पेशावर ते काबूल हे अंतर सुमारे 280 किलोमीटर आहे, जे कापण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. चीनची नजर अफगाणिस्तानच्या खनिज साठ्यावरही आहे.

    अमेरिकन सैन्य माघारीनंतर चीन सक्रिय

    अफगाणिस्तानमध्ये तांबे, कोळसा, लोह, लिथियम आणि युरेनियम तसेच तेलाचा साठा आहे, ज्यावर चीनची दीर्घ काळापासून नजर आहे. काही चिनी खाण कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणाकडे दुर्लक्ष करून त्या बाजारात प्रवेश करण्याचे ठरवले आहे. यासह बीआरआय यशस्वी करण्यासाठी चीनने रस्ते आणि रेल्वे नेटवर्कचे जाळे तयार करण्याची संपूर्ण योजना तयार केली आहे. असे सांगितले जात आहे की सुमारे 5 रेल्वे नेटवर्कची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या घोषणेनंतर चीन आणि पाकिस्तान सक्रिय झाले होते.

    अफगाणच्या स्थानिक बाजारावर चीनची नजर

    चीनचे परराष्ट्र मंत्री वांग हे यांनी तालिबान नेत्यांची भेट घेतली. त्याचवेळी अफगाणिस्तानमध्ये बीआरआयचे स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न सुरू झाले. याशिवाय चीनने अफगाणिस्तानच्या स्थानिक बाजारपेठेलाही ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चीनने आता अफगाण लोकांच्या सर्व गरजा चीनमधून पुरवण्याची तयारी केली आहे, ज्यामध्ये खाण्या-पिण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी प्लांट उभारण्याची तयारी केली जात आहे.

    In Taliban Governance China is increasing economic power by starting big projects in Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!