वृत्तसंस्था
पुणे – पुणे आणि पुण्याचे टांगेवाले… पुणे आणि पुण्याचे रिक्षावाले हे नेहमी खिल्ली पुण्याबाहेरच्या लोकांचा खिल्ली उडविण्याचा विषय राहिले आहेत. पण याच पुण्यातल्या रिक्षावाल्यांनी एकत्र येऊन एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे आणि कोरोनाच्या संकटकाळात तो पुणेकरांसाठी मोठा उपकारक ठरतो आहे. in pune riksha ambulance
पुण्याच्या रिक्षाचालकांनी एकत्र येऊन जुगाड अँब्युलन्स नावाचा उपक्रम सुरू केला आहे. हे रिक्षाचालक आपल्या रिक्षात ऑक्सिजन सिलिंडर आणि अन्य वैद्यकीय सुविधा ठेवतात आणि गरजू रूग्णांना रूग्णालयापर्यंत पोहोचेपर्यंत मदत करत राहतात. डॉ. केशव क्षीरसागर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी रिक्षाचालकांसह एकत्र येऊन या रिक्षांना जुगाड अँब्युलन्स असे नाव दिले आहे.
लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळविण्यासाठी बरेच कष्ट पडतात. पेशंटची इमर्जन्सी असते. त्यांना ताबडतोब ऑक्सिजनची गरज असते. अशा पेशंटना ऑक्सिजन मिळावा यासाठी सध्या तीन रिक्षांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. रिक्षाचालकांना ऑक्सिजन लावण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच त्यांना तातडीच्या सेवेसाठी उपयुक्त ठरेल असे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यातून पेशंटना लाभ मिळतो आहे, असे डॉ. केशव क्षीरसागर यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.
रिक्षाचालकांचा ग्रुप तयार करून एक हेल्पलाइन नंबरही शेअर करण्यात आला आहे. त्यावर पेशंट किंवा नातेवाईक संपर्क करू शकतात. रिक्षाचालकांना कोविड पेशंटच्या वाहतूकीच्या वेळी घ्यायच्या काळजीची पुरेशी माहिती देण्यात आली आहे, असे डॉ. क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.
in pune riksha ambulance
महत्त्वाच्या बातम्या
- Project Heal India : किरण खेर आजारी असुनही अनुपम खेर यांचा मदतीसाठी पुढाकार ; वैद्यकीय उपकरणांची पहिली खेप अमेरिकेतून दाखल
- सोनियांसह १२ नेत्यांचा मोदींच्या दिशेने “पत्रबाण”; ज्या केंद्रावर टीकास्त्र त्याच्याचकडे नऊ कलमी मागण्याही… पण पत्राचे खरे रहस्य काय??
- कोरोना संक्रमणातही भारताच्या औद्योगिक उत्पादनांची गरुडभरारी ; 22.4 टक्के वाढ
- महाराष्ट्राने १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण थांबविले; लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढविण्याची राज्य मंत्रिमंडळाची शिफारस
- उरळी कंचनला चोरीच्या कारमधून पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्न; चार जणांच्या टोळीला अटक