• Download App
    लसीकरणात पुणे जिल्ह्याचा तिसरा क्रमांक ; २५ लाखांवर जणांना दिले दोन्ही डोस In Proportion of Population Pune district is in Third Place In Vaccination

    लसीकरणात पुणे जिल्ह्याचा तिसरा क्रमांक ; २५ लाखांवर जणांना दिले दोन्ही डोस

    वृत्तसंस्था

    पुणे : लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यामध्ये लसीकरणात पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.In Proportion of Population Pune district is in Third Place In Vaccination

    २५ लाख ६५ हजार ७९० नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात यश आले आहे. ग्रामीण भागातील ११ लाख ४० हजार ७९० नागरिक, पुणे महापालिका क्षेत्रातील साडेनऊ लाख, तर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील चार लाख ७५ हजार जणांना डोस दिले.

    जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, राज्यात कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सातारा या चारही जिल्ह्यांत लसीकरण झाले आहे.

    पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात १८ वर्षावरील एक कोटी १७ लाख ४८ हजार लोकसंख्येचे लसीकरण करायचे आहे. ४५ वर्षांवरील ४८ टक्के  नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ४५ पेक्षा जास्त वयोगटाची लोकसंख्या ३५ लाख २४ हजार ५९१ आहे. यापैकी पहिला डोस घेतलेले १९ लाख ५८ हजार, तर दुसरा डोस घेतलेले पाच लाख ६६ हजार नागरिक आहेत. एकूण २५ लाख २४ हजार जणांना लशीची पहिली किंवा दोन्ही डोस दिले आहेत.

    दरम्यान, ६० वर्षांवरील नऊ लाख ९५ हजार ७५० नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. यापैकी सात लाख ८० हजार जणांना लशीची पहिला डोस दिला. हे प्रमाण ८० टक्के  आहे. दुसरा डोस दोन लाख १५ हजार ७५० नागरिकांना दिली असून हे प्रमाण २७ टक्के  आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

    In Proportion of Population Pune district is in Third Place In Vaccination

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!