• Download App
    लोकलमधून बेकायदा, मास्कशिवाय प्रवास करणाऱ्यांकडून 3 कोटी रुपयांचा दंड वसूल Illegal, unmasked travel by local Train ; A fine of Rs 3 crore was recovered from the perpetrators

    लोकलमधून बेकायदा, मास्कशिवाय प्रवास करणाऱ्यांकडून 3 कोटी रुपयांचा दंड वसूल

    वृत्तसंस्था

    मुंबई : लोकलमधून अवैध प्रवास करणाऱ्या 75 हजार प्रवाशांकडून सुमारे 3 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या साठ दिवसांत नियम मोडणारे प्रवासी जाळ्यात अडकले आहेत. बनावट ओळखपत्र आणि मास्कशिवाय प्रवास या कारणासाठी हा दंड रेल्वेने वसूल केला आहे. Illegal, unmasked travel by local Train ; A fine of Rs 3 crore was recovered from the perpetrators

    लोकलने फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी आहे. तरीही अनेक जण तिकिट किंवा बनावट कागदपत्रे बनवून बेकायदा प्रवास करत होते. मुंबईतील मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने अशा प्रवाशांवर कारवाई केली आहे. दोन महिन्यांत सुमारे 75 हजार लोकांवर कारवाई केली.



    1 एप्रिल ते 31 मे या कालावधीत एकूण  75 हजार 793 प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून रेल्वेने 3 कोटी 97 लाख रुपयांचा दंड वसूल केला.

    14 एप्रिलपासून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. 17 एप्रिल ते 21 मे दरम्यान,1 हजार 61 प्रवाशांवर मास्कशिवाय प्रवास केल्याबद्दल कारवाई केली आहे. बनावट ओळखपत्र बनवून प्रवास करणारे 808 प्रवासी पकडले होते. अशा प्रत्येक प्रवाशाकडून 500 रुपयांचा दंड आकारला. बनावट आयकार्ड बनवणारे बहुतेक प्रवासी बीएमसीचे नाव वापरत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

    Illegal, unmasked travel by local Train ; A fine of Rs 3 crore was recovered from the perpetrators

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…