पृथ्वीवरून डायनोसोर का नष्ट झाले याबाबत अभ्यासकांमध्ये सतत नवनवे संशोधन सुरु असते. काही संशोधक असं मानतात की अशनीची धडक झाली नसती तरीही डायनासोर्स नष्ट झाले असते. कारण त्यांचं वर्चस्व संपत आलं होतं. महाकाय टेरोसोरसनी आकाशावर वर्चस्व ठेवलं असतं. हवामान थंड होत चालल्यानं डायनासोर नष्ट झाले असते, असं मत ब्रिस्टल युनिव्हर्सिटीतील पॅलिएंटॉलॉजिस्ट अभ्यासकांच्या गटाने व्यक्त केले आहे. How giant dinosaurs perished from the earth
चार कोटी वर्षांपासून डायनासोर संपत चालले होते आणि सस्तन प्राण्यांनी त्यांची जागा घेतली असतीच असं ते मानतात. नष्ट झालेल्या प्रजातींची जागा घेण्याचा डायानासोरसचा वेग सस्तन प्राण्यांपेक्षा कमी होता. अमेरिकेतल्या कॉलेज पार्क येथील युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडमधील मांसभक्षी डायनसोरवरील अभ्यासकांच्या मते साडेसहा कोटी वर्षांपूर्वी काही प्रजाती नष्ट झाल्या असत्या कारण त्या काळात भारताच्या दख्खन पठारावर ज्वालामुखींचे प्रचंड उद्रेक झाले होते. तरीसुद्धा पॅलिओसिन आणि ईओसिन युगात डायनासोरच्या सर्वसाधारण जीवशास्त्रात फारसे बदल झाले नसते. या युगातही क्रिटॅशिअस युगातील डायनसोर सहज जगू शकले असते.
बदलत्या हवामानात डायानासोर चांगल्यापैकी जगू शकले असते. क्रिटॅशिअस युगाच्या अखेरीस डायनासोर बदलांना जुळवून घेऊ शकेल. नष्ट होणाऱ्या प्राण्याच्या गटांची लक्षणं त्यांच्यात दिसत नव्हती. उत्क्रांतीची बरीच शक्यता असलेला हा गट होता. डायनासोरस जगले असते तर, त्यांच्या उत्क्रांतीत कोणत्या बाबींनी हातभार लावला असता? ट्रिसेरॅटॉप्सपासून गवताळ प्रदेशांत वेगाने धावू शकणाऱ्या डायनासोरची उत्पत्ती झाली असती. त्यांच्यासमोर पहिलं मोठं आव्हान असतं, ते म्हणजे पर्यावरण बदलाचं. साडे पाच कोटी वर्षांपूर्वी पॅलिओसिन ईओसिन थर्मल मॅक्झिम ही घटना घडली होती.
यात जगाचं तापमान आजच्या तापमानपेक्षा 8 अंश सेल्सियसनं जास्त होतं आणि वर्षा वनांनी पूर्ण पृथ्वी व्यापली होती. बहुधा या परिस्थितीत उंच मानेचे सोरोपॉड्स वेगाने वाढले असते. त्यांचं प्रजनन कमी वयात झालं असतं. युरोपच्या बेटांवर क्रिटेशिअस युगाच्या शेवटच्या कालखंडात बुटक्या सोरोपॉडसची नोंद आहे.
यांचा आकार एखाद्या गाईपेक्षा किंचित मोठा होता. दक्षिण अमेरिकेतील मध्य क्रिटेशिअस कालखंडातील टिटॅनोसोर (131 फूट लांबी) या कालखंडापर्यंत संपले होते.
How giant dinosaurs perished from the earth