• Download App
    कोरोनाची लक्षणे असल्यास उपचारात हयगय नको, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश High court orders govt. regarding corona

    कोरोनाची लक्षणे असल्यास उपचारात हयगय नको, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – कोरोना संबंधित आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली तरी जर कोरोनाची लक्षणे रुग्णांमध्ये असतील, तर त्याची दखल घेऊन त्यांच्या उपचारात हयगय करू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. High court orders govt. regarding corona

    अनेक रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली असता, त्याचा अहवाल नकारात्मक येत आहे; पण त्या रुग्णांमध्ये कोरोनाची संभाव्य लक्षणे आढळली असतात. अशा वेळी काही रुग्णालये रुग्णांना दाखल करण्यास नकार देतात; मात्र यामुळे रुग्णांना उपचार मिळण्यासाठी विलंब होतो आणि संसर्गही वाढतो, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका वकील विल्सन जयस्वाल यांनी केली आहे. मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली.



    राज्य सरकारने १७ मे रोजी शासकीय अध्यादेश जारी केला असून सर्व संशयित रुग्णांवरही उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. या अध्यादेशाची अंमलबजावणी काटेकोर आणि गंभीरपूर्वक करा, असे निर्देश न्यायालयाने दिले. लक्षणे असलेल्या पण वैद्यकीय चाचणी नसलेल्या व्यक्तीवर उपचार करणे कोणत्याही कारणांमुळे टाळता कामा नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याचिकादार वकिलाने एका प्रसंगावरून तातडीने याचिका दाखल केल्याबद्दल खंडपीठाने कौतुक केले. अशा घटना डोळे उघडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात, असे न्यायालय म्हणाले.

    High court orders govt. regarding corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitish Kumar : निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश यांची घोषणा- बिहारमध्ये 125 युनिट वीज मोफत; 1 ऑगस्ट 2025 पासून लाभ

    Delhi AAP :दिल्लीत AAP वर आणखी एका घोटाळ्याचा आरोप; प्रतिभा विकास योजनेत 145 कोटींचा घोटाळा; एलजींनी दिले चौकशीचे आदेश

    Chhangur Baba : छांगूर बाबाच्या 14 ठिकाणी EDचे छापे; पहाटे 5 वाजता बलरामपूर आणि मुंबईत पोहोचली पथके