वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी महिला काँग्रेसच्या कार्यक्रमात एकाहून एक सरस वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांनी काँग्रेसची भलामण केली आहे काँग्रेसवर छुपी टीका केली आहे. हेच कळेनासे झाले आहे…!! Have you seen a picture of Mohan Bhagwat with any woman? That’s because their org suppresses women&our org give them a platform
ते म्हणाले की, तुम्ही जेव्हा महात्मा गांधींचे चित्र बघता तेव्हा त्यांच्या भोवती दोन-तीन महिला दिसतात. पण तुम्ही कधी मोहन भागवत यांच्या भोवती महिला असल्याचे बघितले आहे काय? त्यांच्याभोवती महिला दिसणारच नाहीत. कारण त्यांची संघटना महिलांवर दडपशाही करते. आपली काँग्रेस संघटना महिलांना प्लॅटफॉर्म देते. मोदी किंवा संघाने कधीही महिलेला या देशाचे पंतप्रधान केलेले नाही. काँग्रेसने मात्र एका महिलेला या देशाचे पंतप्रधान करून दाखविले आहे, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्या भाषणावरून सोशल मीडियात त्यांची खिल्ली उडवण्यात येत आहे. महात्मा गांधी यांच्या भोवती महिला असत म्हणजे राहुल गांधी यांना नेमके काय म्हणायचे आहे? काँग्रेसने महिलांना पंतप्रधानपदाची संधी दिली, याचा अर्थ पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कन्येलाच पंतप्रधान बनवले हेच त्यांना सांगायचे आहे काय…??, असे बोचरे सवाल सोशल मीडियातून करण्यात येत आहेत. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला शाखा राष्ट्रसेविका समितीच्या रूपात अस्तित्वात आहे हे देखील राहुल गांधींच्या गावी नसल्याची टीका सोशल मीडियात नेटिझन्सनी केली आहे.
Have you seen a picture of Mohan Bhagwat with any woman? That’s because their org suppresses women&our org give them a platform
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेस दहशतवादाची जननी, नेहरूंचा रामावर विश्वास, इंदिराजींनी संतांवर गोळक्षबार केला तर सोनियांनी रामाचे अस्तित्व नाकारले, योगी आदित्यनाथांचा आरोप
- अफगणिस्थानचे माजी उपराष्ट्रपती सालेह यांच्या घणात सोन्याच्या वीटा, डॉलर्सच्या बंडलाह सापडले ४८ कोटी, तालीबानचा दावा
- किरण रिजीजू यांची धडाकेबाज कामगिरी पाहून सरन्यायाधिश म्हणाले, मला वाटले ते तर ऑक्सफोर्डमध्ये शिकलेत, नंतर समजले गावातील शाळेत घेतले शिक्षण
- इन्फोसिससारख्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे, पांचजन्यमधील लेखावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली नाराजी