• Download App
    किमान आधारभूत किंमत रद्द केल्यास राजकारण सोडेन | The Focus India

    किमान आधारभूत किंमत रद्द केल्यास राजकारण सोडेन

    • हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांचे आश्वासन

    विशेष प्रतिनिधी 

    नारनौल (वृत्तसंस्था) : शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्यास भाजप सरकार कटिबद्ध आहे. परंतु, ते रद्द केल्यास मी राजकारणच सोडून देईन, असे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले. haryana CM manoharlal khattar says Will certainly give MSP farmers

    हरियाणातील नारनौल येथील जाहीर मेळाव्यात बोलताना शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा दिला. खट्टर म्हणाले की, जर कोणी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) सोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर राजकारण सोडून देईन. “एमएसपी नेहमीच राहील. जर कोणी हे रद्द करण्याचा प्रयत्न केला तर मनोहर लाल खट्टर राजकारण सोडतील. एमएसपी संपणार नाही, ”ते म्हणाले, “एमएसपी पूर्वी होता, तो आता अस्तित्त्वात आहे आणि भविष्यातही राहील.” haryana CM manoharlal khattar says Will certainly give MSP farmers

    शनिवारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याशी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा केल्यानंतर खट्टर यांचे हे विधान समोर आले आहे. “या समस्येवर तोडगा (शेतक चर्चेच्तून शोधायला हवा. हा मुद्दा लवकरच सोडविला जावा, असे मी म्हटले आहे.

    मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, केंद्र सरकार नवीन शेती कायद्याच्या कलमाशी संबंधित त्यांच्या मुद्द्यांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे.

    haryana CM manoharlal khattar says Will certainly give MSP farmers

    खट्टर म्हणाले की, केंद्र आणि शेतकरी संघटनांमधील चर्चाची आणखी एक फेरी होऊ शकते, परंतु तोमर यांनी निषेध नोंदवणाऱ्या शेतकर्‍यांच्या संघटनांनी त्या तीन कृषी कायद्यांविषयी “शंका” व्यक्त करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की विशिष्ट विषयांवर चर्चा होणे आवश्यक होते आणि त्यांच्या तक्रारींकडे सध्या “स्पष्टतेचा अभाव” आहे. शेतकऱ्यांना चर्चेची तारीख निश्चित करवी,असे आवाहन त्यांनी केले.

    Related posts

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!

    सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध

    मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??