• Download App
    GOOD NEWS : कोराना लसीकरणात आघाडीवर भारत-आणखी एक आनंदाची बातमी !Novavax च्या कोविड लसीला भारतात मान्यता;12-18 वर्षांच्या मुलांना मिळणार लस GOOD NEWS: India Leads in Corana Vaccination - Another Good News! Novavax's Covid Vaccine Approved in India

    GOOD NEWS : कोराना लसीकरणात आघाडीवर भारत-आणखी एक आनंदाची बातमी !Novavax च्या कोविड लसीला भारतात मान्यता;12-18 वर्षांच्या मुलांना मिळणार लस

    कोराना लसीकरणात आघाडीवर असलेल्या भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.Novavax च्या कोविड लसीला भारतात मान्यता मिळाली आहे.

    GOODNEWS: India Leads in Corana Vaccination – Another Good News! Novavax’s Covid Vaccine Approved in India


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोराना लसीकरणात आघाडीवर असणाऱ्या भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.नोव्हावॅक्सच्या (Novavax) कोरोना लसीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. ही लस 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाईल. नोव्हावॅक्सची ही लस NVX-CoV2373 म्हणूनही ओळखली जाते. भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया  ही लस बनवत आहे. भारतात ही लस Covovax या नावानं ओळखली जाईल.GOOD NEWS: India Leads in Corana Vaccination – Another Good News! Novavax’s Covid Vaccine Approved in India

    Covovax ही देशातील चौथी अशी लस आहे, जी भारतात 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाणार आहे. याआधी भारतात बायोलॉजिकल E’s Corbevax, Zydus Cadila’s ZyCoV-D आणि Bharat Biotech’s Covaccine ही 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर वापरली जात होती

    Covovax चा 80 टक्के प्रभाव

    नोव्हावॅक्सनं गेल्या महिन्यात सांगितलं होतं की, त्यांची लस 80 टक्के प्रभावी आहे. भारतात 12 ते 17 वर्षे वयोगटातील 2,247 मुलांवर या लसीची चाचणी घेण्यात आली. नोव्हावॅक्सच्या लसीला ‘Covovax’ गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच मंजुरी देण्यात आली होती. पण, तेव्हा ही मान्यता केवळ 18 वर्षांवरील लोकांसाठी होती. Covovax ला नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेकडूनही आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळालीय.

    GOOD NEWS: India Leads in Corana Vaccination – Another Good News! Novavax’s Covid Vaccine Approved in India

    Related posts

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!