• Download App
    गोलमाल ! शरद पवार पंतप्रधान मोदींनंतर आता अमित शाह यांच्या भेटीला : सेना भेटते कॉंग्रेसला-राष्ट्रवादी भाजपला ; या भेटींमागे दडलयंं काय ? Golmaal! Sharad Pawar now meets Amit Shah after PM Modi: Sena meets Congress-NCP meets BJP; What is behind these visits?

    चर्चा तर होणारच ! शरद पवार पंतप्रधान मोदींनंतर आता अमित शाह यांच्या भेटीला : शिवसेना भेटते कॉंग्रेसला-राष्ट्रवादी-भाजपला ; या भेटींमागे दडलयंं काय ?

    • यापुर्वी गडकरी,पियुष गोयल,राजनाथसिंह यांचीही भेट

    • राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे अमित शाह यांना भेटले. यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: राजकारणात सध्या भेटी गाठींचा दौर सुरू आहे .मतभेद दूर सारून आपल्या विरोधकांना भेटण्याचा जणू पायंडाच पडलायं.इकडे शिवसेना कॉंग्रेसला भेटते तर दुसरीकडे राष्ट्रवादी भाजपच्या भेटी गाठींवर जोर देत आहे .काल संजय राऊत राहूल गांधीना भेटले तर आज राष्ट्रवादी
    काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अमित शाहंना भेटले .त्यामूळे नक्कीच काहितरी गोलमाल असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत .Golmaal! Sharad Pawar now meets Amit Shah after PM Modi: Sena meets Congress-NCP meets BJP; What is behind these visits?

    शरद पवार हे आज 3 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री आणि नवे सहकार मंत्री अमित शाह यांना दिल्लीत भेटले.शरद पवार पुन्हा एकदा दिल्लीला पोहोचले. त्यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दुपारी 3 वाजता सुरू झालेली बैठक सुमारे 45 मिनिटे चालली आणि दुपारी 3.45 वाजता संपली.

    राजधानी दिल्लीमध्ये अचानक झालेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात मात्र वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण मागील महिन्यात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. आता पवार अमित शाह यांना भेटले त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    शरद पवार यांची अमित शाह यांच्यासोबतची अधिकृत बैठक पूरग्रस्तांना मदत आणि एनडीआरएफच्या मदतीचे निकष बदलण्यात यावेत यासाठी असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, असं असलं तरी या बैठकीत या दोन दिग्गज नेत्यांमध्ये राजकीय चर्चा देखील होण्याची दाट शक्यता आहे.

    साधारण 15 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली होती. तर आता मात्र ते अमित शाह यांना भेटले असल्याने सर्वांना या भेटीविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

    अमित शाह हे देशाचे नवे सहकार मंत्री झाल्यापासून अशी एक चर्चा सुरु आहे की, या आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून अमित शाह राष्ट्रवादी काँग्रेसला वेगवेगळ्या प्रकारे शह देऊ शकतात. अशावेळी शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.

    काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि नितीन गडकरी यांची देखील भेट झाली होती.याशिवाय त्यांनी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल या नेत्यांच्या देखील भेटी घेतल्या आहेत. पवारांच्या भाजप नेत्यांसोबतच्या वाढलेल्या या भेटींमुळे पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? हे लवकरच स्पष्ट होईल .

     

     

    Golmaal! Sharad Pawar now meets Amit Shah after PM Modi: Sena meets Congress-NCP meets BJP; What is behind these visits?

    Related posts

    आव्हाड – पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे टीकास्त्र; कठोर कारवाईचे आदेश; पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर