• Download App
    गोलमाल ! फडणवीस-पवार ; फडणवीस-खडसे; आता खडसे-पवार ; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चाच चर्चा !Golmaal! Fadnavis-Pawar; Fadnavis-Khadse; Now Khadse-Pawar; what's going on in Maharashtra's politics!

    गोलमाल ! फडणवीस-पवार ; फडणवीस-खडसे; आता खडसे-पवार ; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चाच चर्चा !

    घटनाक्रम

    • सोमवार: पत्रकार परिषदेत ठाकरे पवार सरकारला धोबीपछाड दिल्यानंतर फडणवीसांचा मोर्चा थेट शरद पवारांकडे वळला .

    • मंगळवार : फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर होते त्यावेळी ते थेट एकनाथ खडसेंच्या घरी गेले.

    • बुधवार: तोच आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतली.Golmaal! Fadnavis-Pawar; Fadnavis-Khadse; Now Khadse-Pawar; what’s going on in Maharashtra’s politics!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येऊन गेले. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आता भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही आज पवारांची भेट घेतली.. फडणवीसांनंतर खडसे यांनी पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. Golmaal! Fadnavis-Pawar; Fadnavis-Khadse; Now Khadse-Pawar; what’s going on in Maharashtra’s politics!

    31 मे रोजी एकीकडे महाविकास आघाडीचे सर्व नेते मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनात होते. तर दुसरीकडे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली होती.

    महाराष्ट्राच्या राजकारणात गोलमाल :

    महाराष्ट्रात सध्या कुछ तो गडबड है दया असचं चाहिएं चित्र दिसतयं .कारणही तसचं आहे . गेल्या तीन दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.

    त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.  ही भेट सदिच्छा भेट होती म्हणून सांगितलं असलं तरी या भेटीची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली होती. देवेंद्र फडणवीस यांनी ही भेट डॅमेज कंट्रोलसाठी घेतली असावी अशीही चर्चा झाली. मात्र तसं काहीही नाही उलट डॅमेज कंट्रोलची गरज ही महाविकास आघाडी सरकारला आहे असंही उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

    मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौरा केला. या दौऱ्याच्या सुरूवातीलाच देवेंद्र फडणवीस हे एकनाथ खडसे यांच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी भाजप खासदार रक्षा खडसेंची भेट घेतली होती. मात्र देवेंद्र फडणवीस हे खडसेंच्या घरी गेल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या.

    त्यानंतर रक्षा खडसे यांनी एक सुचक विधान देखील केले की नाथाभाऊ आजही भाजपवर प्रेम करतात त्यांनी अनेक वर्ष भाजपसोबत घालवले आहेत.

    या चर्चा थांबत नाहीत तोच आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतली. एकनाथ खडसे यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे.

    काय म्हणाले एकनाथ खडसे?

    आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांची सदिच्छा भेट घेतली. शास्त्रक्रियेपश्चात त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे पण उपस्थित होते असंही खडसे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

     एकनाथ खडसे हे शरद पवारांच्या घरी दाखल झाले . ही भेट सदिच्छा भेट असली तरीही याचे विविध राजकीय अर्थ लावले जात आहेत .

    अब इस गोलमाल का जवाब तो आनेवाला वक्त ही बतायेगा!

    Golmaal! Fadnavis-Pawar; Fadnavis-Khadse; Now Khadse-Pawar; what’s going on in Maharashtra’s politics!

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस