• Download App
    Give shape to your own personality through dialogue|संवादातून द्या स्वतःच्या व्यक्तीमत्वाला आकार

    लाईफ स्किल्स: संवादातून द्या स्वतःच्या व्यक्तीमत्वाला आकार

    अनेकदा आपल्या नोकरी अथवा शिक्षणात अशी परिस्थिती निर्माण होते की त्यावेळी आपल्यावर अत्यंत दबाव निर्माण होतो. काहीवेळा त्या दबावाखाली काम करताना आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अशावेळी योग्य संवादातून त्यातून मार्ग निघू शकतो. आपण कोणाशी कसे बोलतो, समोरच्या व्यक्तीशी कसे वागतो, कसा संवाद साधतो याला व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने फार महत्व असते हे नेहमी लक्षात ठेवा. संवादामध्ये बोलणारा जसा महत्वाचा असतो तितकाच ऐकणाराही असतो.Give shape to your own personality through dialogue

    कोणी ऐकणारेच नसेल तर बोलणाऱ्याचेही महत्व संपून जाते. आपण जेव्हा समोरच्याचे ऐकत असता त्यावेळी ते नीट ऐका. तसेच त्यालाही ते तुमच्या शारिरीक हालचालींमधून ते जाणवू द्या. समोरची व्यक्ती कशी बसली आहे. अथवा उभी आहे, त्याप्रमाणे तुम्ही कृती करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून संवादात आपलेपणाची भावना निर्माण होण्यास मदत होईल. आपला अभिप्रायदेखील योग्य असू द्या. नेहमी सकारात्मक अभिप्राय ठेवा. एखादा मुद्दा पटला अथवा नाही तर त्यावर हो किंवा नाही असे मत मांडा.

    एखाद्या मुद्द्याबद्दल मनात शंका असतील तर बोलणे पूर्ण झाल्यावर त्यासंदर्भात प्रश्न विचारा. ऐकण्याबरोबरच माहिती संपादन करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आपल्या अडचणी, एखादी निर्णय प्रक्रिया, समस्या निराकरण करण्यासाठी आपण आपल्याजवळील माहितीचा उपयोग करून घेत असतो. अधिकाधिक माहिती मिळविण्यासाठी प्रश्न विचारणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. योग्यवेळी योग्य प्रश्न विचारून आपल्याला हवे तसे समर्पक उत्तर मिळवायाचे कौशल्य अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

    मुळात प्रश्न का विचारावेत हे आधी जाणून घ्या. उगाच समोरच्याला आडवे लावण्यासाठी किंवा त्रास देण्याच्या हेतूने कधीही प्रश्न विचारत बसू नका. माहिती प्राप्त करण्यासाठी प्रश्न विचारा. तसेच संभाषणावर नियंत्रण राखण्यासाठी, स्पष्टीकरण करण्यासाठी, व्यक्तिमत्व अन्वेषण करण्यासाठी, ज्ञान चाचणी करण्यासाठी किंवा पुढील विचाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रश्न विचारावेत. त्यासाठी नेहमी रचनात्मक प्रश्न विचारा. आपल्याला जे विचारायचे आहे त्यासाठी योग्यपद्धतीने प्रश्नाची मांडणी करा. जेणेकरून अर्थाचा अनर्थ होणार नाही. कधी कधी प्रश्न विचारण्याऐवजी त्या परिस्थितीत शांत राहणे उपयुक्त ठरते. समोरच्या व्यक्तीला प्रोत्साहन मिळेल अश्यापद्धतीने प्रश्न योजा.या पद्धतीचा अवलंब केल्यास संवाद अधिकाधिक मजबूत व सक्षम करण्यास मदत होते.

    Give shape to your own personality through dialogue

    Related posts

    काँग्रेसला खरं तर अख्ख्या बिल्डिंग रीडेव्हलपमेंटची गरज; पण निदान आता प्लंबर तरी बोलवा!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!

    फाईलींचा प्रवास टेबलावरून कपाटात; हा तर सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा पवारांचा कबुली जबाब!!