• Download App
    दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता द्या; एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणीGive exhausted dearness allowance to ST employees before Diwali

    दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता द्या; एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

    प्रतिनिधी

    मुंबई : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वेळोवेळी वाढ केली असून त्यांना या महिन्यापासून २८ टक्के महागाई भत्ता लागू झाला आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही १२ % च महागाई भत्ता मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थकीत महागाई भत्ता द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे.Give exhausted dearness allowance to ST employees before Diwali

    महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेवर होत नाही. वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी कर्जबाजारी झाले. त्यामुळे जवळपास २५ कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

    वेतन ७ नोव्हेंबर ऐवजी १ नोव्हेंबर रोजी करावे

    दिवाळी सण तोंडावर आला असल्याने दिवाळीपूर्वी ऑक्टोबर २०१९ पासून आजअखेर प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याचा फरक कर्मचारी व अधिकारी यांना अदा करावा, तसेच या महिन्यापासून सदर महागाई भत्ता हा शासनाप्रमाणे २८ टक्के इतका देण्यात व दिवाळी सण ४ नोहेंबरपासून सुरू होत असल्याने ऑक्टोबर महिन्याचे वेतन ७ नोव्हेंबर ऐवजी १ नोव्हेंबर रोजी करावे, अशी मागणीही त्यांनी एसटी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने ही मागणी पूर्ण केली तर कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.

    Give exhausted dearness allowance to ST employees before Diwali

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अयुब, याह्या, झिया उर रहमान नाही दाबू शकले, तर मोहम्मद युनूस कोण??; शेख हसीनांच्या अवामी लीगच्या पुनरुत्थानाचा निर्धार!!

    पाकिस्तानचा अर्थसंकल्प पाकिस्तानी सरकार नव्हे, तर IMF करणार फायनल; कर्ज फेडीच्या वसुलीवर भर, भारतावरही अशी वेळ आली होती, पण…

    Chhagan Bhujbal फडणवीस सरकारमध्ये भुजबळांची “एन्ट्री” म्हणजे अप्रत्यक्ष राष्ट्रवादीच्या ऐक्यातच खोडा, जयंत पाटील + रोहित पवार यांचा मार्ग रोखला!!