प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वेळोवेळी वाढ केली असून त्यांना या महिन्यापासून २८ टक्के महागाई भत्ता लागू झाला आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही १२ % च महागाई भत्ता मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थकीत महागाई भत्ता द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे.Give exhausted dearness allowance to ST employees before Diwali
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेवर होत नाही. वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी कर्जबाजारी झाले. त्यामुळे जवळपास २५ कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
वेतन ७ नोव्हेंबर ऐवजी १ नोव्हेंबर रोजी करावे
दिवाळी सण तोंडावर आला असल्याने दिवाळीपूर्वी ऑक्टोबर २०१९ पासून आजअखेर प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याचा फरक कर्मचारी व अधिकारी यांना अदा करावा, तसेच या महिन्यापासून सदर महागाई भत्ता हा शासनाप्रमाणे २८ टक्के इतका देण्यात व दिवाळी सण ४ नोहेंबरपासून सुरू होत असल्याने ऑक्टोबर महिन्याचे वेतन ७ नोव्हेंबर ऐवजी १ नोव्हेंबर रोजी करावे, अशी मागणीही त्यांनी एसटी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने ही मागणी पूर्ण केली तर कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.
Give exhausted dearness allowance to ST employees before Diwali
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपनं बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेबही बेईमान झाले नसते’ ; गुलाबराव पाटील यांचा घणाघात
- सोमय्यायांना काश्मीर मध्ये पाठवा, दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ, संजय राऊत यांनी साधला निशाणा
- अहमदनगर जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर येणार- राधाकृष्ण विखे पाटील
- महाविकास आघाडीतील सर्व मंत्र्यांना संजय राऊत यांचे आवाहन, गप्प बसू नका, टीकेला प्रतिटीका करा!