विशेष प्रतिनिधी
जळगाव : कोरोनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मला ठाण्याला जाण्याची गरज नाही. उलटपक्षी गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल, अशा शब्दांमध्ये आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी महाजनांनी केलेल्या टिकेचा समाचार घेतला.
कोरोनावरून खडसे आणि महाजन या दोन्ही बलाढ्य नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा आता पातळी सोडून घसरला आहे.
कालच नाथाभाऊंनी ”मोक्काच्या भितीने गिरीश महाजनांना कोरोना झाला का ?” असा प्रश्न केल्यानंतर आ. गिरीश महाजन यांनी त्यांना ठाण्याच्या ट्रिटमेंटची गरज असल्याची टीका केली होती. यावरून माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी ठाण्यावरून थेट बुधवार पेठेचाच दाखला दिल्याने दोन्ही नेत्यांमधील शब्दयुध्दाचा भडका उडाला आहे.
– गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवा
– कोरोनावरून खडसे- महाजन यांच्या शब्दयुद्ध
– एकनाथ खडसे यांनी टीकेची पातळी सोडली
– नेत्यांमध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्याने पातळी सोडली