• Download App
    ह्या जर्मनीतील संस्थेने चालू केली भारतातील प्राचीन पत्रावळीची परंपरा. पत्रावळीची किंमत आहे प्रत्येकी ८०० रुपये | German firm selling centuries old leaf plates for Rs 800 per piece

    ह्या जर्मनीतील संस्थेने चालू केली भारतातील प्राचीन पत्रावळीची परंपरा. पत्रावळीची किंमत आहे प्रत्येकी ८०० रुपये

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: भारतात पत्रावळीमधे जेवण करण्याची परंपरा खूप प्राचीन काळापासून चालू आहे. पत्रावळी, पत्तर, विस्तर अशी त्याची विविध नावे आहेत. ही शंभर वर्षे जुनी परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये या परंपरेला विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदात चरक संहितेमध्ये याचे महत्त्व सांगितले आहे. या संहितेनुसार पत्रावळीमधे जेवण केल्याने पचन प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे होते.

    This German firm selling centuries old leaf plates for Rs 800 per piece

    भारतामध्ये लग्नापासून ते मयतापर्यंत तसेच गल्ली गल्लीतील गाड्यांपर्यंत ह्या पानांपासून बनवलेल्या प्लेट्स वापरल्या जातात. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की ‘लिफ रिपब्लिक’ नावाच्या एका जर्मन संस्थेने आपल्या इनोव्हेटिव्ह पत्रावळीचे कलेक्शन बाजारात आणले आहे. हे ‘जुनं ते सोनं’ या म्हणीचे एक उत्तम उदाहरण आहे. परंतु याबाबत टि्वटवर काही लोकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या होत्या की “आम्ही अशा प्रकारच्या पत्रावळी खूप वर्षापासून वापरत आलो आहे. यामध्ये इनोव्हेटिव्ह काय आहे?”


    स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री : राजकुमारी अमृत कौर, चॅम्पियन ऑफ वुमन राइट्स!


    लिफ रिपब्लिक या पत्रावळ्या ८.५० युरो (८७३रुपये) पर प्लेट या दराने विकत आहेत. भारतामध्ये पानांपासून बनवलेली ताटे आणि भांडी वर्षानुवर्षे वस्त्र उद्योगांमध्ये वापरली जात आहेत. फक्त भारतातच नव्हे तर इतर एशियन देशातसुद्धा याचा वापर आहे.

    लिफ रिपब्लिकच्या कलेक्शनमध्ये पानांपासून बनवलेली बाउल्स, प्लेट्स आणि ट्रेज यांचा समावेश आहे. त्यांनी बनवलेले ही उत्पादने ही पूर्णपणे प्लास्टिक, तेल, ग्लू, तसेच केमिकल रहित आहेत. त्यांनी बनवलेल्या पत्रावळ्या पर्यावरणासाठी अनुकूल (इको-फ्रेंडली आहेत). पाश्चात्य संस्कृती ही आता पर्यावरणाला अनुकूल असे उत्पादने बनवित आहेत याचे कौतुक होत आहे.

    २०१९ ला हैदराबाद मध्ये वेणुगोपाल आणि माधवी विपुलांचा या जोडीने विस्तरकु नावाचे एक स्टार्टअप चालू केले होते. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील वस्त्रोद्योगाला याचा खूप मोठा फायदा झाला. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील स्त्रियांनाही यातून रोजगार मिळून स्वतःच्या पायावर उभे राहता आले.

    This German firm selling centuries old leaf plates for Rs 800 per piece

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…