• Download App
    शेतकरी आंदोलनासाठी परदेशातून निधी | The Focus India

    शेतकरी आंदोलनासाठी परदेशातून निधी

    • पंजाबच्या शेतकरी संघटनेवर आरोप

    विशेष प्रतिनिधी

    चंदीगड : दिल्ली सीमेवर तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्‍या पंजाबच्या शेतकरी संघटनेवर परदेशी निधी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. संघटनेने त्यासाठी आवश्यक नोंदणी लवकर पूर्ण करावी, असा इशारा बँकेने शेतकरी संघटनेला दिला.

    Funding from abroad for the farmers’ movement

    भारतीय किसान युनियन, असे संघटनेचे नाव आहे. युनियनचे सरचिटणीस सुखदेवसिंग कोक्री कलान यांनी म्हटले आहे की, पंजाब आणि मोगा जिल्ह्यातील पंजाब आणि सिंध बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोलावले आणि फॉरेक्स विभागाकडून एक मेल आल्याचे सांगितले. सिंग यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांत त्यांच्या संस्थेला 8 ते 9 लाख रूपये मिळाले आहेत. त्याबद्दल बँक अधिकाऱ्यांनी आम्हाला बोलावले होते. परदेशात राहणारे पंजाबी लोक सामाजिक कार्यासाठी असे पैसे नियमितपणे देणगी म्हणून देतात. सिंह म्हणाले की जेव्हा बँक त्यांना लेखी नोटिस देईल तेव्हा त्यांची संघटना त्यावर उत्तर देईल.

    बीकेयूचे प्रमुख जोगिंदर उगरा म्हणाले, “सर्व परदेशी भारतीय जे आम्हाला निधी पाठवत आहेत, ते पंजाबमधील आहेत आणि परदेशात वास्तव्यास आहेत. ते फक्त मदत करत आहेत. यात काय अडचण आहे? आम्ही कोणत्याही अर्थतज्ज्ञ किंवा कमिशन एजंटची मदत घेत नाही आहोत? “

    Funding from abroad for the farmers’ movement

    शेतकरी संघटनेवरील कर कायद्याचा वापर हा विवादास्पद कृषी कायद्यांविरूद्धच्या शेतकऱ्यांच आंदोलन दडपण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. – अमरिंदर सिंह, पंजाबचे मुख्यमंत्री

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??

    Indian Army पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच भारताने सध्या थांबविले फायरिंग; भारतीय सैन्य दलांचा स्पष्ट खुलासा; शस्त्रसंधी शब्द नाही वापरला!!