• Download App
    पद मिळताच सिद्धू यांना आंदोलक शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे Farmares agitated against sidhuu

    पद मिळताच सिद्धू यांना आंदोलक शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे

    विशेष प्रतिनिधी

    अमृतसर – पंजाब काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी खटकडकला या शहीद भगतसिंग यांच्या पूर्वजांच्या गावाला भेट दिली. मात्र शेतकरी आंदोलकांनी सिद्धू यांना काळे झेंडे दाखविले. पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. Farmares agitated against sidhuu

    सिद्धू यांचे आगमन होताच शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कीर्ती किसान युनियनचे शेतकरी कार्यकर्ते तेथे आधीपासूनच आंदोलन करीत होते. सिद्धू यांना काही प्रश्न विचारण्याची आंदोलकांची मागणी होती. त्यावेळी काँग्रेस नेते दुसऱ्या बाजूला होते. ढकलाढकली किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ते प्रयत्नशील होते. सुरवातीला सिद्धू यांना भेटू देऊ असे आश्वासन पोलिसांनी दिले,



    पण त्याचवेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. अखेरीस पोलिसांनी वाहतूक रोखून सिद्धू यांना दुसऱ्या बाजूने बाहेर काढले. परिस्थिती आटोक्यात राहिल्यामुळे लाठीमार करण्याची गरज भासली नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

    आंदोलकांनी नंतर अर्धा तास रास्ता रोको केले. कीर्ती किसान युनियनचे नेते सोहनसिंग अठवाल यांनी सांगितले की, सिद्धू यांना घेराव घालण्याचा आमचा प्रयत्न नव्हता. काँग्रेससह विविध राजकीय पक्ष आमच्या मदतीला आलेले नाहीत. त्याबद्दल आम्हाला निषेध नोंदवायचा होता.

    Farmares agitated against sidhuu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची नुसतीच चर्चा; प्रत्यक्षात तामिळनाडूत झाले ऑपरेशन शिट्टी!!

    अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांची तब्बल २० अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त गुंतवणूक, तरीही भारतीयांना H1Bvisa ची समस्या; अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांचे उत्तर काय??

    रयत शिक्षण संस्थेत पवारांची मक्तेदारी; अध्यक्ष पदावर आणली नातवाची पिढी!!; उदयनराजेंची टीका खरी!!