• Download App
    ...आणि सुमित्राताई महाजन दिर्घायुषी झाल्या ! Fake news of former Lok Sabha Speaker Sumitra Mahajan demise

    …आणि सुमित्राताई महाजन दिर्घायुषी झाल्या !

    • श्रद्धांजलीची एवढी घाई का? सुमित्राताईंच्या निधनाचं शशी थरुर यांच्याकडून ट्विट, ताई मात्र स्वस्थ.
    • शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. Fake news of former Lok Sabha Speaker Sumitra Mahajan demise

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्लीः असं मानतात की जर एखाद्याच्या निधनाची बातमी पसरली आणि ती खोटी ठरली तर त्या व्यक्तीचं आयुष्य वाढतं. आज सुमित्रा महाजन यांचही आयुष्य नक्कीच वाढलं.लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आजारी आहेत. इंदूरच्या माजी खासदार असलेल्या सुमित्रा महाजन यांना तापाची लक्षणं आढळल्यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांचा कोरोना अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आला. त्यांना थोडासा ताप आहे. त्यांची तब्येत हळूहळू सुधारत आहे.

    विशेष म्हणजे सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमीही सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

    काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमी दिली होती. परंतु भाजपचे कैलास विजयवर्गीय यांनी सुमित्राताई स्वस्थ असल्याचं रिट्विट करून त्यांना सांगितलं. त्यानंतर शशी थरूर यांनीसुद्धा सुमित्रा महाजन यांच्या निधनाचं ट्विट डिलीट केलं.

    विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही ट्विटरवर सुमित्रा महाजन यांचं निधन झाल्याचं सांगत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. पण हे वृत्त खोट असल्याचं समजल्यानंतर सुप्रिया सुळेंनीही ट्विट काढून टाकलंय.

    Fake news of former Lok Sabha Speaker Sumitra Mahajan demise

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये