• Download App
    Fadnavis and Shinde are true decision makers, Ajit Pawar has no role 29 महापौरांच्या नावांचा निर्णय म्हणायला "महायुतीचे नेते" घेणार, प्रत्यक्षात त्यात अजितदारांचा सहभाग नगण्य; फडणवीस आणि शिंदेच निर्णायक!!

    29 महापौरांच्या नावांचा निर्णय म्हणायला “महायुतीचे नेते” घेणार, प्रत्यक्षात त्यात अजितदारांचा सहभाग नगण्य; फडणवीस आणि शिंदेच निर्णायक!!

    Fadnavis and Shinde

     

    नाशिक : 29 महापौरांच्या नावांचा निर्णय घेणारे बसलेत दावोसला जाऊन; माध्यमांनी 150 + नगरसेवकांना आणले रेस मध्ये!!, असे आज दिवसभरात घडले. पण त्या पलीकडे जाऊन महापौरांच्या नावांचा निर्णय म्हणायला “महायुतीचे नेते” घेणार, पण त्यात अजितदादांचा सहभाग नगण्य असेल. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच निर्णायक भूमिका बजावतील.Fadnavis and Shinde are true decision makers, Ajit Pawar has no role

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते तिकडे निघून गेले. त्यांनी तिथे महाराष्ट्रासाठी तब्बल 16 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले.



    – 29 महापालिकांमध्ये प्रत्येकी 5/6 जण रेस मध्ये

    पण त्याचवेळी महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या महापौरपदाच्या निवडणुकीचे वारे वाहिले. आज 29 महापालिकांच्या महापौरांच्या सोडतीचा दिवस होता. ती सोडत झाल्यानंतर 15 महापालिकांमध्ये महिलाराज येणार हे स्पष्ट झाले. त्याचबरोबर काही ठिकाणी वेगवेगळे आरक्षणे पडली. त्यानंतर मराठी माध्यमांनी आणि त्यातल्या पत्रकारांनी आपापली बुद्धी चालवून 150 पेक्षा जास्त नगरसेवकांना महापौरपदाच्या रेसमध्ये आणले. म्हणजे 29 महापालिकांमध्ये साधारण प्रत्येकी 5/6 नगरसेवक महापौर होतील, असे गृहीत धरून त्यांनी 150 पेक्षा जास्त नगरसेवकांना महापौर पदाची लालूच दाखवली.

    – फडणवीसांची साधी प्रतिक्रियाही नाही

    प्रत्यक्षात निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस मध्ये असल्याने त्यांनी महाराष्ट्रातल्या महापौर पदांबाबत एकही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. कुठली नावे कुणी रेस मध्ये आणलीत, कुठली नावे नाही आणलीत, याची साधी दखल सुद्धा त्यांनी घेतली नाही.

    – अजितदादांचा सहभागही नाही

    माध्यमांनी मात्र परस्परच आपापल्या (नसलेल्या) सूत्रांच्या आधारे वेगवेगळ्या नावांमध्ये महापौर पदांची स्पर्धा लावून टाकली. 29 पैकी दोन महापालिकांमध्ये काँग्रेसचे महापौर होणे अपेक्षित आहे. लातूर आणि चंद्रपुरात काँग्रेसचे नेते निर्णय घेतील, (पण तिथे सुद्धा कुठली गॅरेंटी नाही. कारण संख्याबळ पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूचे नाही. तिथे भाजप खोडा घालू शकतो.) पण उर्वरित 27 महापालिकांमध्ये भाजप किंवा शिवसेना या दोनच पक्षांचे महापौर होणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तिथे संधीच नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोनच नेते बसून घेतील. या निर्णय प्रक्रियेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा साधा सहभाग सुद्धा असणार नाही. कारण अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक भाजपला शत्रुस्थानी नेऊन लढवली होती. या दोन्ही ठिकाणी भाजपने त्यांचा दारुण पराभव केला. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते 27 शहरांमध्ये महापौर “महायुतीचे नेते” ठरवणार, असे म्हणत असले, तरी प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोनच नेते ते महापौर ठरवतील. त्या निर्णय प्रक्रियेत अजित पवारांचा सहभाग असणार नाही आणि असलाच तर तो फार नगण्य असेल. फडणवीस आणि शिंदे हेच निर्णायक असतील.

    Fadnavis and Shinde are true decision makers, Ajit Pawar has no role

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    29 महापौरांच्या नावांचा निर्णय घेणारे बसलेत दावोसला जाऊन; माध्यमांनी 150 + नगरसेवकांना आणले रेस मध्ये!!

    अंगात काळा स्वेटशर्ट, डोक्याला मुंडासे, हातात कुदळ; मनरेगा श्रमिक संमेलनात गाजले राहुल गांधींचे फोटोशूट!!

    मुंबईचे महापौर पद कायमचे हुकताच ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसला दिसला “अन्याय”!!, पण नियम तर होताच काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातलाच!!