कॉंग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनीही आपले भाऊ राहुल गांधी यांच्याप्रमाणेच थेट रस्त्यावर न उतरता सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मोदी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, भारतीय रेल्वेला अडानी समूहाच्या हातात सोपविण्याचा मोदी सरकारचा घाट आहे, या त्यांच्या पोस्टमधील खोटेपणा फेसबुकनेच उघड केला. फेसबुकने त्याला ‘भ्रामक’ असे म्हटल्यानंतर प्रियंका गांधी यांनी ही पोस्ट डिलीट केली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनीही आपले भाऊ राहुल गांधी यांच्याप्रमाणेच थेट रस्त्यावर न उतरता सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मोदी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, भारतीय रेल्वेला अडानी समूहाच्या हातात सोपविण्याचा मोदी सरकारचा घाट आहे, हा त्यांच्या पोस्टमधील खोटेपणा फेसबुकनेच उघड केला. फेसबुकने त्याला ‘भ्रामक’ असे म्हटल्याने प्रियंका गांधी यांनी ही पोस्ट डिलीट केली.
Facebook exposes Priyanka Gandhi
भारतीय रेल्वे अडानी उद्योग समुहाच्या हातात सोपविल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये केला होता. मात्र, या आरोपाला कोणताही आधार नसल्याने फेसबुकने ही चुकीची पोस्ट असल्याचे म्हटले. त्यावर तातडीने प्रियंका गांधींनी पोस्ट डिलीट केली. पीआयबीने प्रियंका गांधी यांच्या फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता. यामध्ये म्हटले आहे की फेसबुकवर व्हिडीओ टाकून प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की भारतीय रेल्वे एका खासगी कंपनीच्या ताब्यात देण्यात येत आहे. मात्र, हा दावा चुकीचा आहे. ही केवळ एक व्यावसायिक जाहिरात होती. रेल्वेचा महसूल वाढविण्यासाठी ही जाहिरात केली जात आहे.
Facebook exposes Priyanka Gandhi
प्रियंका गांधी यांनी म्हटले होते की, भारतीय रेल्वेला कोट्यवधी भारतीयांनी आपल्या मेहनतीने उभे केले आहे. परंतु, भाजपा सरकार आपले अरबपती मित्र अडानी यांचा शिक्का रेल्वेवर लावत आहे. उद्या रेल्वेचा मोठा भाग मोदी यांच्या अरबपती मित्रांना दिला जाईल. देशातील शेतकरी आपली शेती मोदींच्या अरबपती मित्रांच्या हातातून वाचविण्यासाठी प्राण पणाला लावून वाढवित आहे. यापूर्वीही प्रियंका गांधी यांनी अशा पध्दतीने खोटेपणा करत फेसबुकवर शेतकरी आंदोलनाचा एक व्हिडीओ टाकून शेतकऱ्यांना भडकाविण्याचा प्रयत्न केला होता. पीआयबी फॅक्ट चेकने यातील खोटेपणा उघड करत ही पोस्ट फसवी असल्याचे म्हटले होते.