शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना काही जागा लढवणार असल्याची घोषणा केली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई:पाच राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये तसेच राजकीय नेत्यांमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील शिवसेनेवर निशाणा साधला होता. शिवसेनेच्या पाच राज्यातील निवडणुका लढण्याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारलं असता, पाच राज्यात शिवसेनेचा सरपंचही नाही, असे ते म्हणाले होते . Face-to-face: Pramod Sawant says that there is no Shiv Sena Sarpanch in five states ; Sanjay Raut’s sarcastic remark was not even from BJP ….
गोव्यात यावेळी भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होईल. २०२२मघ्ये २२ प्लसचा नारा असून स्वयंपूर्ण गोव्याच्या विकासासाठी मतदार भाजपच्या बाजूने मतदान करतील. गोव्यात अस्तित्वच नसलेले पक्ष (तृणमूल काँग्रेस, आप) प्रयोग करण्यासाठी आले आहेत. बाहेरून आलेल्या पक्षांनी एकदा गेल्या निवडणूका लक्षात घ्याव्यात. संजय राऊत गोव्यात का येतात हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. गोव्यात शिवसेनेचा साधा सरपंचही नाही.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधतान प्रत्युत्तर दिले आहे.
कधी काळी गोव्यात भाजपचाही सरपंचही नव्हता, सरपंच काय पंचही नव्हता, गोमंतक पक्ष फोडून ते निवडून येऊ लागले, असे म्हणत राऊतांनी प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. दादरा-नगरहवेलीतही आमचा सरपंच नव्हाता तरी आम्ही जिंकलो, सरपंच असल्याचा नसल्याचा विधानसभेत काही फरक पडत नाही, आम्ही आधी विधानसभा जिंकू, मग सरपंच आपोआप होतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा (5 State Assembly Election) कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केलाय. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांत निवडणुका होत आहेत.
अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना काही जागा लढवणार असल्याची घोषणाच संजय राऊत यांनी केली.