पाच राज्यांच्या निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक चर्चा जरी उत्तर प्रदेशाची झाली असली तरी एक्झिट पोल मध्ये मोठा उलटफेर मात्र पंजाब मध्ये झालेला दिसतो आहे. काँग्रेसला निवडणुकीत जबरदस्त फटका बसला असून अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी दिल्ली सोडून पंजाब सारख्या महत्त्वाच्या राज्यात प्रचंड बहुमताने सत्तेवर येण्याचा एक्झिट पोल विविध वृत्तवाहिन्यांनी वर्तवला आहे.Exit Poll Punjab: Upset in Punjab; Aam Aadmi Party overwhelming majority !!; In the exit polls, however, Kejriwal overtook other Chief Ministers at the national level
आज तकने वर्तविलेल्या एक्झिट पोल मध्ये आम आदमी पार्टीला 79 ते 90 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर टीव्ही नाईन भारत वर्ष 56 – 61 जागा आम आदमी पार्टीला एक्झिट पोल मध्ये दिल्या आहेत. झी न्यूजच्या एक्झिट पोल मध्ये देखील आम आदमी पार्टीला 55 ते 62 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बहुमताचा आकडा पंजाब मध्ये 59 आहे.
केजरीवालांना राष्ट्रीय संधी
अशा स्थितीत पंजाब मध्ये मोठा उलटफेर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर मोठा “बूस्टर डोस” करू शकतो. विशेषतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या आपले राज्य सोडून राष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाकांक्षा उफाळल्या असताना अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सोडून पंजाब सारख्या सीमावर्ती राज्यामध्ये संपूर्ण बहुमताने यश मिळणे याला राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातल्या राजकारणामध्ये फार मोठे महत्त्व प्राप्त करून देणारे ठरणार आहे…!!
मोदी यांच्या विरोधात क्षेत्रीय पातळीवर ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव अरविंद केजरीवाल,. एम. के. स्टालिन यांच्यासारखे मोठे नेते मजबुतीने उभे आहेत पण त्यांना राष्ट्रीय पातळीवर आपल्या राज्यांच्या पलीकडे फारसे स्थान नाही. अशा स्थितीत अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी जर दिल्ली सोडून पंजाब सारख्या सीमावर्ती राज्यात बहुमताने सत्तेवर येणार असेल तर केजरीवाल हे या सर्व मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत मोदी विरोधात तरी सर्वात आघाडीवर दिसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जनमताच्या पाठिंब्याच्या आधारावर अरविंद केजरीवाल यांचा राष्ट्रीय पातळीवरचा दावा इतर मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक मजबुतीने उभा राहिलेला दिसण्याची शक्यता आहे.
अर्थात 2024 ला अजून अडीच वर्षे अवकाश आहे. अशा स्थितीत पंजाब सारखे सीमावर्ती राज्य जरी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने जिंकले तरी ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव, एम. के. स्टालिन यांच्यासारखे बडे प्रादेशिक नेते केजरीवाल यांचे नेतृत्व कितपत स्वीकारतील…??, याविषयी देखील शंका व्यक्त होऊ शकते. परंतु आज पंजाब मधल्या एक्झिट पोल मध्ये तरी आम आदमी पार्टी दिल्ली सोडून इतर राज्यांमध्ये बहुमताने सत्तेवर येऊ शकते हा आत्मविश्वास अरविंद केजरीवालांसाठी फार महत्त्वाचा बूस्टर डोस घेऊन आला आहे. निदान एक्झिट पोल मध्ये तरी तसे दिसून येत आहे.
ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव यांनी आपापली राज्ये जरी जिंकली असली तरी इतर राज्यांमध्ये जाऊन नुसत्या मुख्यमंत्र्यांच्या आणि त्या बड्या नेत्यांच्या भेटी घेणे, पत्रकार परिषदा घेऊन मोदी विरोधात नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न करणे एवढ्यापुरतेच “मर्यादित” राजकीय कर्तृत्व दाखवले आहे. परंतु अरविंद केजरीवाल यांनी त्या पलिकडे जाऊन पंजाब सारखे राज्य जिंकणे याला राष्ट्रीय पातळीच्या राजकारणात जमिनी स्तरावर अन्य मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत अधिक महत्त्वाचे निश्चितच ठरणार आहे.
Exit Poll Punjab: Upset in Punjab; Aam Aadmi Party overwhelming majority !!; In the exit polls, however, Kejriwal overtook other Chief Ministers at the national level
महत्त्वाच्या बातम्या
- शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचे काम निकृष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
- Nawab Malik : नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्ये जाताना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घोषणा, नवाब भाई आगे बढो हम तुम्हारे साथ है!!
- Good News : महापालिकेचा बेस्ट निर्णय!आता २४ तास ‘बेस्ट’सेवा
- फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेक ; चप्पल फेकू नये, रोहित पवारांची “विनंती”; आता “अज्ञात” व्यक्तीविरुद्ध गुन्हा!!