• Download App
    एकनाथ शिंदे बंड : शिवसेनेत लागले वर्चस्वाचे भांडण; मंत्रालयातून राष्ट्रवादीचे आर्थिक भरण-पोषण!! 1170 कोटींची कामे, 319 कोटी रिलीज!!|Eknath shinde : Shivsena struggles for dominance but NCP getting more and more funds

    एकनाथ शिंदे बंड : शिवसेनेत लागले वर्चस्वाचे भांडण; मंत्रालयातून राष्ट्रवादीचे आर्थिक भरण-पोषण!! 1170 कोटींची कामे, 319 कोटी रिलीज!!

    शिवसेनेत लागले वर्चस्वाचे भांडण; मंत्रालयातून मात्र राष्ट्रवादीचे आर्थिक भरण-पोषण अशी आजची 24 जून 2022 ची स्थिती आहेEknath shinde : Shivsena struggles for dominance but NCP getting more and more funds

    राजकारणात मिडिया तसे फार वरवरचे असते. मीडियातून जे समोर येते तेच राजकारण चालते असा सर्वसामान्य लोकांचा समज करून दिला जातो. पण त्या पलिकडे खरे राजकारण चालत असते ते फारसे कोणी समजावून सांगत नाही किंवा कोणाच्या लक्षात येत नाही. एकीकडे वरती शिवसेनेत वर्चस्वाचे भांडण लागले आहे पण दुसरीकडे मंत्रालयातून राष्ट्रवादीचे आर्थिक भरण-पोषण मजबुतीने सुरू आहे!!



    शरद पवार हे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार वाचविण्याच्या कामाला लागल्याचे मीडिया दाखवत असला तरी प्रत्यक्षात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आणि आमदारांना आपापल्या फाइल्स ताबडतोब क्लिअर करून घेण्याच्या घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मंत्रालयात अधिकाऱ्यांची आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची जोरदार धावपळ सुरू आहे. 21 आणि 22 जून या 2 दिवसांत तब्बल 1170 कोटी रुपयांच्या कामांपैकी 319 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. म्हणजे त्याचे निधी वाटप झाले आहे. हा बहुसंख्या निधी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पदरात पडला आहे. टीव्ही 9 मराठी ही बातमी दिली आहे.

    त्याचबरोबर आणखी काही फाईल्स क्लिअर करण्याचे आदेशही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने दिले आहेत. अवघ्या 2 दिवसांत मंत्रालयातून 106 जीआर काढले आहेत. यापैकी बहुसंख्य जीआर हे जलसंधारण आणि पाणी पुरवठा खात्याचे आहेत. शिवसेनेच्या कोट्यातले नगर जिल्ह्यातले मंत्री शंकरराव गडाख यांनी सगळ्यात अधिक जीआर काढले आहेत.

     आकडे बोलतात

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्या क्षणी राजीनामा देऊ शकतात किंवा त्यांचे सरकार बरखास्त होऊ शकते हे लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे आणि आमदारांची ही लगबग सुरू आहे. राष्ट्रवादीचे अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात अन्याय केल्याचा सगळ्यात मोठी तक्रार शिवसेनेचे आमदारांची आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील शिवसेनेच्या आमदारांच्या तक्रारीला दुजोरा दिला आहे आणि सरकारच्या शेवटच्या क्षणी देखील राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार मंत्रालयातून आपापल्या खात्यांचे आणि आमदारांचे आर्थिक भरण-पोषण करण्याच्या कामाला वेगाने लागले आहेत. 2 दिवसांत 106 जीआर अकराशे 1170 कोटींची कामे आणि 319 कोटी रुपये निधी वाटप ही आकडेवारी बरेच काही बोलून जाणारी आहे.

    Eknath shinde : Shivsena struggles for dominance but NCP getting more and more funds

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!