• Download App
    शिक्षणोत्सव: मित्रांना भेटण्याची उत्सुकता अन्... ! राज्यभरात शाळा सुरू : मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद Education Festival: Curiosity to meet friends ...! Schools open across the state: CM interacts with students, teachers and parents

    शिक्षणोत्सव: मित्रांना भेटण्याची उत्सुकता…! राज्यभरात शाळा सुरू : मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी-शिक्षक-पालकांशी संवाद

    • राज्यात तब्बल दीड वर्षानंतर आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. 

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: कोरोनाच्या संकटावर मात करत राज्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. दीड वर्षांनंतर राज्यातील शाळा सुरू झाल्या असून, पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधला. तसंच पालकांनाही खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. विद्यार्थी हे आपले आधारस्तंभ आहेत. त्यांची काळजी घ्या, असं सांगतानाच एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होणार नाहीत असा निर्धार करा,असे मुख्यमंत्री म्हणाले .Education Festival: Curiosity to meet friends …! Schools open across the state: CM interacts with students, teachers and parents

    ‘शाळेची पुन्हा घंटा वाजली आहे. मला आज माझ्या शाळेचे दिवस आठवत आहेत. शिक्षकांना आणि पालकांना आवाहन आहे की, आपल्या विद्यार्थ्यांची आणि पाल्यांची काळजी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

    मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे-

     मला माझे शाळेतले दिवस आठवताहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचा दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता असायची, नवीन वह्या-पुस्तकं, गणवेश मिळायचे. आताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे.

     शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणं कठीण आणि आव्हानात्मक होतं आणि आहे. मुलं नाजूक असतात, त्यांचं वय घडण्याचं असतं. आज आपण मुलांच्या विकासाचं, प्रगतीचं दार उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.

     मी नेहमी या विषयावर टास्क फोर्सशी चर्चा करतो. आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. शिक्षकाला बरं वाटत नसेल, तर त्याने लगेच चाचणी करून घ्यावी. पावसाळा अजून संपला नाही. साथीचे रोगही येतात. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेऊन सर्वांनी काम करावं.

     शाळांच्या खोल्यांची दारं बंद नको. हवा खेळती हवी. निर्जंतुकीकरण करून घ्या. निर्जंतुकीकरण करताना देखील काळजी घ्या. मुलांच्या बसण्यात अंतर ठेवणं, मास्क घालणे, स्वच्छतालयांची स्वच्छता हवी.

    कोरोनानं आपल्याला बरेच काही शिकवलं आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विदयार्थी, शिक्षक, पालक यांना शुभेच्छा देतो. मुलांची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. ती निश्चितपणे पार पडली जाईल असा मला विश्वास आहे. एकदा उघडलेली शाळा परत बंद करायची नाही या निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू.

    Education Festival: Curiosity to meet friends …! Schools open across the state: CM interacts with students, teachers and parents

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना