• Download App
    ED Raid Ajit Pawar : सगळे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे तरीही उपमुख्यमंत्री म्हणतात...माझ्या तीन बहिणींच्या कारखान्यांवर छापे का मारले? ED Raid Ajit Pawar: All the sugar factories are still close to Ajit Pawar, says the Deputy Chief Minister ... Why were the raids on the factories of my three sisters?

    ED Raid Ajit Pawar : सगळे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे तरीही उपमुख्यमंत्री म्हणतात…माझ्या तीन बहिणींच्या कारखान्यांवर छापे का मारले?

    • Ajit Pawar income tax department raid: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर, कारखान्यांवर आयटी विभागाकडून करण्यात आलेल्या छापेमारीबाबत अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: आयकर विभागानं आज सकाळच्या सुमारास एकाच वेळी राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर छापे टाकले. काही वेळाने ही बाब स्पष्ट झाली की, हे सगळे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे आहेत. तसंच अजित पवार यांच्या काही कंपन्यांवर देखील छापेमारी करण्यात आली.
    यात अजित पवार यांच्या कंपन्यासह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवर देखील आज अचानक छापे मारण्यात आले . आयकर विभागाने मारलेल्या या छाप्यांबाबत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर हे सगळे छापे फक्त राजकीय हेतूने मारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.ED Raid Ajit Pawar: All the sugar factories are still close to Ajit Pawar, says the Deputy Chief Minister … Why were the raids on the factories of my three sisters?

     

    दरम्यान, अजित पवार यांनी त्यांच्या तीन बहिणींच्या घरी आणि कारखान्यांवर मारलेल्या छापेमारीविषयी दु:ख व्यक्त केलं आहे. फक्त त्या माझ्या बहिणी आहेत या हेतून झालेली ही कारवाई आहे असंही अजित पवार म्हणाले.

     

    मला एका गोष्टीचं खूप दु:ख झालं..’

    ‘आयकर विभागाने माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापा मारला याबद्दलही मला काही म्हणायचं नाही. पण मला एका गोष्टीचं खूप दु:ख झालं. ते म्हणजे माझ्या तीन बहिणींच्या घरावर कारखान्यांवर देखील छापे मारण्यात आले.’
    ‘या तीनही बहिणींची 35 ते 40 वर्षापूर्वी लग्न झालेली आहेत. त्यातील एक बहीण कोल्हापूर आणि दोन पुण्यातील आहेत. त्यांच्या कारखान्यांवर देखील धाडी टाकल्या. आता यामागचं मला कारण माहिती नाही. त्या आपलं जीवन व्यवस्थित आपलं जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झालेली आहेत, नातवंडं आहेत. पण फक्त अजित पवारांचे नातेवाईक म्हणून जर आयकर विभागाने धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा विचार करावा. कोणत्या पातळीवर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे देखील जनतेनं पाहावं.’

    ‘माझ्या कंपन्यांवर धाड टाकली याचं मला काही नाही, पण नातेवाईकांच्या घरी आणि कारखान्यांवर धाड कशी? त्यांचा राजकारणाशी संबंध नाही, कारखान्यांशी संबंध नाही.. फक्त त्या माझ्या बहिणी आहेत म्हणून धाडी टाकायचा याचं मला वाईट वाटलं. इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण करणं मला पटलेलं नाही.’

    अजित पवारांच्या तीनही बहिणींच्या घरावर छापे

    अजित पवारांच्या ज्या तीन बहिणींच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे त्यापैकी सर्वात मोठ्या बहीण डॉक्टर रजनी इंदूलकर या पुण्यातील बावधन भागात राहतात. आज सकाळपासून इथे आयकर विभागाचे अधिकारी सुरक्षा रक्षकांसह पोहचले आहेत.
    अजित पवारांच्या बहिण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहतात. त्या गृहिणी असून त्यांचे पती डॉक्टर आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे पुण्यात मोदी बाग सोसायटीतच राहतात. त्यांच्या घराच्या शेजारीच हे छापे सुरु आहेत.
    तर विजया पाटील या कोल्हापुरात असतात. त्यांच्या घरी देखील आयकर विभागाने छापे मारण्यास सुरुवात केली आहे.

    जरंडेश्वर साखर, दौंड शुगर्स, आंबालिका शुगर्स , कारखाना, पुष्पदनतेश्वर शुगर आणि नंदूरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाने धाडी मारल्या. दुसरीकडे बारामतीमधील एका कंपनीसह काटेवाडीमधील एका व्यक्तीच्या घरावर देखील छापा मारण्यात आला आहे.

    ED Raid Ajit Pawar: All the sugar factories are still close to Ajit Pawar, says the Deputy Chief Minister … Why were the raids on the factories of my three sisters?

     

    Related posts

    Operation sindoor : सियालकोट, चकलाला यांच्यासह 7 पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर भारताचे हल्ले; ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे!!

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    भारत-पाक तणावात राफेल उत्पादक कंपनीचे शेअर्स वधारले; डसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स 2 आठवड्यांत 8% वाढले