विशेष प्रतिनिधी
बंगळुरु : कर्नाटक विधान परिषदेचे उपाध्यक्ष एसएल धर्मे गौडा यांनी कथित प्रकारे आत्महत्या केली आहे. जेडीएस आमदाराचा छिन्नविछिन्न मृतदेह मध्य कर्नाटकच्या पर्वतीय भागात त्यांचे मुळ शहर चिकमगलूरच्या जवळ रेल्वे ट्रॅकवर आढळला. Dy Speaker of Karnataka commits suicide, Congress to be blamed
त्यांचा मृतदेह पहाटे २ वाजता (२९ डिसेंबर) च्या सुमारास सापडला. ६४ वर्षीय गौडा काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सदस्यांनी सभागृहात घेरल्याने चर्चेत आले होते. काँग्रेस सदस्यांचा आरोप होता की, ते बेकायदेशीरपणे सभागृहाची अध्यक्षता करत आहेत. काँग्रेस सदस्यांनी त्यांना अध्यक्षांच्या खुर्चीतून खाली खेचले होते.
सभागृहात कॉंग्रेसच्या सदस्यांनी खुर्चीवरून खेचले असता धर्मगौडाची अनेक छायाचित्रे व व्हिडिओ व्हायरल झाला होता . यानंतर ते अस्वस्थ झाले.भाजपने त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध केला होता.
Dy Speaker of Karnataka commits suicide, Congress to be blamed
धर्मे गौडा यांच्या मृत्यूमुळे कर्नाटकच्या राजकारणात वादळ येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे काँग्रेसला पिंजर्यात उभे केले जाऊ शकते. त्यांचे भाऊ एसएल भोजे गौडा सुद्धा एमएलसी आणि कर्नाटकचे माजी सीएम एचडी कुमारस्वामी यांचे निकटवर्तीय आहेत.