नाशिक – विधानसभेतल्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनातली सगळी चर्चा महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने घडवून आणलेल्या १२ भाजप आमदारांच्या निलंबनाभोवती केंद्रीत झाली आहे. discussion only on 12 BJP MLA`s suspension, but thackeray – pawar ducks congress from assembly speaker post again
पण या सगळ्यात एका महत्त्वाच्या राजकीय मुद्द्याकडे सगळ्यांचे दुर्लक्ष झाले, तो म्हणजे विधानसभेची अध्यक्षपदाची निव़डणूक ठाकरे – पवार सरकारने टाळून काँग्रेसला या पदापासून पुन्हा एकदा वंचित ठेवले आणि त्यातही ऱाष्ट्रवादीचे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना अध्यक्षांच्या खुर्चीवर बसवून विधानसभेचे कामकाज रेटून चालवून नेले.
यामध्ये आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे आज जरी तांत्रिकदृष्ट्या भास्कर जाधव हे शिवसेनेचे आमदार असले, तरी ते काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे मंत्री होते. ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही होते. त्यामुळे त्यांच्या हाडीमासी राष्ट्रवादीचे राजकारण खेळते आहे. भाजपचे १२ आमदार निलंबित करून भास्कर जाधवांनी एक प्रकारे राष्ट्रवादीलाच मदत केल्याचे स्पष्ट होते.
शिवाय भाजपच्या आमदारांविरोधात आणि त्यांनी आज विधिमंडळाच्या दारात घेतलेल्या अभिरूप विधानसभेच्या विरोधात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचे नेते जास्त आक्रमक असल्याचे दिसले. काँग्रेसचे नाना पटोले तेवढे आक्रमक दिसले. पण त्यांचा सगळा रोख केंद्र सरकारवर होता.
पण एकूण या सगळ्या प्रकारातून यातून ठाकरे – पवार सरकारवर हळू हळू पवार आपली पकड मजबूत करत चालल्याचेही स्पष्ट झाले तसेच विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक टाळून त्यांनी काँग्रेसच्या तोंडालाही पाने पुसून दाखविली. आज अधिवेशन संपले की हिवाळी अधिवेशनापर्यंत अध्यक्षपदाची निवडणूक लांबेल. तो पर्यंत काँग्रेस स्वतःच्या वाट्याला आलेल्या एका सत्तापदापासून वंचित राहील. पवारांच्या राष्ट्रवादीने शिवसेनेच्या साथीने काँग्रेसला असा धोबीपछाड दिला आहे.
पण काँग्रेस नेत्यांच्या हा मुद्दा लक्षातही आलेला दिसत नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केलेल्या राजकीय खेळीवर बेहद्द खूष आहेत. प्रत्यक्षात त्यांनाही या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठेंगाच दाखविला आहे.
discussion only on 12 BJP MLA`s suspension, but thackeray – pawar ducks congress from assembly speaker post again
महत्त्वाच्या बातम्या
- जर्मनीने डेल्टा व्हेरिएंटने प्रभावित भारतीय प्रवाशांवरील बंदी उठवली, ब्रिटनसह अनेक देशांचाही समावेश
- भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा शिवसेनेला आनंद, पण त्यांची ताकद घटणे हे पवारांच्या पथ्यावर पडणे उध्दव ठाकरेंना परवडेल का…??
- केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज विधानसभेत ठराव ?
- सप्टेंबरनंतर देशात थांबल्यास याद राखा, तालिबानची नाटो सैन्याला धमकी
- काँग्रेसला आणखी एक हादरा, नेत्यांचे आउटगोईंग सुरुच, आता प्रणव मुखर्जींचे पुत्र तृणमूलमध्ये