राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर कृषी कायद्यांचं समर्थन करावं की विरोध करावा, असा यक्षप्रश्न आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या आधारे हे कायदे करण्यात आले आहेत. त्यांनी कृषी कायद्यांच्या मूळ तत्वांना विरोध केलेला नाही. ते कधी त्याच्यावर बोलत नाहीत. मात्र, वाहत्या गंगेत अनेक जण हात धुत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी
रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर कृषी कायद्यांचं समर्थन करावं की विरोध करावा, असा यक्षप्रश्न आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या आधारे हे कायदे करण्यात आले आहेत. त्यांनी कृषी कायद्यांच्या मूळ तत्वांना विरोध केलेला नाही. ते कधी त्याच्यावर बोलत नाहीत. मात्र, वाहत्या गंगेत अनेक जण हात धुत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. Devendra Fadnavis alleges Sharad Pawar’s ambivalence over agriculture law
विरोधकांनी कृषी कायदे समजून घेण्याची गरज असल्याचा टोला लगावत फडणवीस म्हणाले की, पंजाब आणि हरियाणा शिवाय इतरत्र कुठेही आंदोलन झाले नाही. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी ट्रॅक्टर चालवण्याशिवाय केलं नाही. शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. काही जण समजून घेऊनही झोपल्याचं सोंग करुन शेतकऱ्यांच्या फायद्याच्या कायद्यांना विरोध करत आहेत.
कृषी कायद्यात ज्या बाबाी आहेत त्यावर महाराष्ट्रात अगोदरच कायदे झाले आहेत. कृषी कायद्यांच्या अध्यादेशांच्या अंमलबजावणीचे आदेश काढणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. ज्यांचे हितसंबंध अडचणीत आहेत तेच लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. शेतकरी आंदोलकांच्यामध्ये काही गट असून त्यांना आंदोलन सुरु ठेवायचं आहे. त्यांना आंदोलनावर तोडगा काढायचा नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.