• Download App
    ओबीसी आरक्षणावरून ठाकरे – पवार सरकारला ठोक ठोक ठोकले; नंतर फडणवीस सिल्वर ओकवर जाऊन पोहोचले Devendra Fadanavis targets thackeray - pawar govt. over OBC reservation, then meets sharad pawar at silver oak

    ओबीसी आरक्षणावरून ठाकरे – पवार सरकारला ठोक ठोक ठोकले; नंतर फडणवीस सिल्वर ओकवर जाऊन पोहोचले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारला ठोक ठोक ठोकले… आणि नंतर ते सिल्वर ओकवर जाऊन पोहोचले… या घटनाक्रमाने महाराष्ट्रातले राजकीय नेते चक्रावले. Devendra Fadanavis targets thackeray – pawar govt. over OBC reservation, then meets sharad pawar at silver oak

    ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे – पवार सरकारवर कठोर प्रहार केले. फडवीस म्हणाले, की ज्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जात आहे. ते ५० टक्क्यांच्या आत यावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यामध्ये २०१० साली कृष्णमूर्ती निकालाचा हवाला यात देण्यात आलेला होता.

    भाजपा सरकारच्या काळात युक्तीवाद करण्यात आला होता. प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी आरक्षण सरसकट २७ टक्के असू शकत नाही, असे त्यावेळी न्यायालयाने म्हटले होते. ५० टक्क्यांवरील आरक्षण गेले, तर जिल्हा परिषद महापालिकेच्या १३० जागांना फटका बसतो, असं आमच्या लक्षात आल्यानंतर महाधिवक्त्यांसह कृष्णमूर्ती निकालाचा अभ्यास केला होता. त्यानुसार अध्यादेश काढून आम्ही ९० जागा वाचवल्या होत्या,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोर्टाच्या या केसमध्ये लक्ष न घालता राज्यातले मंत्री मोर्चे काढण्यात मग्न होते, असा आरोपही त्यांनी केला.

    मात्र, त्यानंतरचा घटनाक्रम अधिक महत्त्वाचा ठरला.

    कारण या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस अचानक सिल्वर ओकवर जाऊन पोहोचले. त्यांनी तेथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे ट्विट फडणवीस यांनी केले. पवारांच्या घरात जाऊन भेट घेतल्याचा फोटो त्यांनी फेसबुकवरही शेअर केला. हा फोटो शेअर केल्याबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

    छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांसकट विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवी समीकरणे जूळत असल्याच्या बातम्या चालू झाल्या. यावर जोरदार चर्चा सुरू असतानाच आज अचानक देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच बरोबर राज्यात नव्या समीकरणाचीही चर्चा सुरू झाली आहे.

    Devendra Fadanavis targets thackeray – pawar govt. over OBC reservation, then meets sharad pawar at silver oak

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…