• Download App
    ३७० हटले, आता मागे वळून बघणे नाही; काश्मीरच्या जनतेचा कौल | The Focus India

    ३७० हटले, आता मागे वळून बघणे नाही; काश्मीरच्या जनतेचा कौल

    • गुपकारला मोठी आघाडी, भाजप दुसऱ्या स्थानावर, काँग्रेस तिसऱ्या स्थानावर घसरली

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर – जम्मू – काश्मीरमधून ३७० कलम हटले. आता मागे वळून बघणे नाही. काश्मीरच्या जनतेने कौल दिला आहे. जिल्हा विकास परिषदेच्या डीडीसीच्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांच्या गुपकार आघाडीला काश्मीर खोऱ्यात मोठी आघाडी मिळाली आहे.ddc elections results, no looking back at 370 article

    तसेच जम्मू विभागात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. आकडे खाली – वर होत आहेत. पण साधारण कौल जनतेने दिला आहे.ddc elections results, no looking back at 370 article

    गुपकार – भाजपमध्ये काश्मीरमध्ये जबरदस्त टक्कर; डीसीसी निवडणूकीतील पहिले कल

    माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तर तिरंग्याखाली निवडणूक न लढविण्याचा निर्धार केला होता. पण त्यांना फारूख अब्दुल्लांशी समझोता करणे भाग पडले. सुरवातीला निवडणूक लढविण्यास तयार नसलेल्या गुपकार पक्षांची भाषा आता काश्मीर खोऱ्यात आघाडी मिळाल्याबरोबर बदलायला सुरवात झाली असून त्यांनी जम्मू – काश्मीरच्या जनतेने भाजपला कसे नाकारले याचा बाजा वाजवायला सुरवात केली आहे.

    सायंकाळी ५ वाजेपर्यंत गुपकार ९४, भाजप ५४, काँग्रे २५ जागांवर जिंकले आणि आघाडीवर असल्याची स्थिती होती. आकडेवारीत सायंकाळनंतर फारसा बदल होणार नसल्याची चिन्हे आहेत.

    भाजपला जनतेने नाकारल्याची प्रतिक्रिया गुपकारचे नेते टीव्ही चॅनेलवरून देत आहेत. तर भाजपने सावध पवित्रा घेत हा विजय लोकशाहीचा असल्याचे म्हटले आहे. जे गुपकारचे लोक भारतीय तिरंग्याखाली निवडणूक लढवायला तयार नव्हते, ते लोक आता त्याच तिरंग्याखाली झालेल्या निवडणुकीचा विजय साजरा करत आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते टीव्हीवरच्या डिबेटमध्ये देत आहेत.

    ddc elections results, no looking back at 370 article

    तरी राज्यातील जनतेचा निकाल साफ आहे, त्यांना ३७० च्या वादातून पुढे जायचे आहे. आता डीडीसीच्या निकालानंतर ३७० च्या वादापेक्षा विकासावर लक्ष केंद्रीत करण्याचा कौल जनतेने दिला आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…