• Download App
    पंतप्रधानांचे भाषण ऐकणाऱ्या शेतकऱ्यांवर पंजाबात झुंडशाही | The Focus India

    पंतप्रधानांचे भाषण ऐकणाऱ्या शेतकऱ्यांवर पंजाबात झुंडशाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकायला जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप पंजाब भाजपकडून करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांना संबोधित केले होते. यावेळी हा प्रकार घडल्याचे भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि राज्यसभा खासदार दुष्यंत कुमार गौतम यांनी सांगितले. Crowds in Punjab over farmers listening to PM’s speech

    वृत्तसंस्था

    चंदीगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकायला जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप पंजाब भाजपकडून करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्याना संबोधित केले होते. यावेळी हा प्रकार घडल्याचे भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि राज्यसभा खासदार दुष्यंत कुमार गौतम यांनी सांगितले. Crowds in Punjab over farmers listening to PM’s speech

    पंजाब सरकारने केलेल्या कारवाईत आमच्या पक्षाचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून एका कार्यकत्यार्ला 22 ते 23 टाके पडले आहेत. पंजाब पोलिसांनी बळाचा वापर करुन शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी घातलेला मंडप देखील हटवण्यात आला, असा आरोप दुष्यंत कुमार गौतम यांनी केला.

    शेतकरी आंदोलनातील डाव्या शक्ती आंदोलनावर मार्ग निघून देत नाहीत, असा आरोप करून दुष्यंत कुमार गौतम म्हणाले, दिल्लीच्या सीमांवर बसलेले आमच्यावर काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी केंद्र सरकार काम करत असल्याचा आरोप करतात.

    Crowds in Punjab over farmers listening to PM’s speech

    मात्र, सोशल मिडीयावर काँग्रेस नेत्यांचे फोटो त्यांच्यासोबत पाहायला मिळतील, असं म्हटलं आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांसोबत सलग पाच ते सहा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये सरकारने शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली आहे.

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!

    Operation Sindoor मधून भारताचा नूर खान + किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का, पाकिस्तानात रेडिएशनचा धोका, अमेरिकेसकट चीनला हादरा!!