- ICC ने ट्विट करुन दिली लसिथ मलिगांच्या निवृत्तीविषयी माहिती
वृत्तसंस्था
नवी दिल्ली:श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाने आज सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. आयसीसीने लसिथ मलिंगाच्या निवृत्तीबद्दल ट्विट करुन माहिती दिली आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मलिंगाने आपल्या नावावर अनेक विक्रमांची नोंद केली आहे.Cricket World: Good Bye! Sri Lanka’s Lasith Malinga joins international cricket
“गेल्या १७ वर्षांत मी जो काही अनुभव मिळवला त्याची आता मैदानात गरज लागणार नाहीये, कारण मी टी-२० क्रिकेट आणि सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतो आहे. परंतू येणाऱ्या नवीन पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमी तत्पर असेन.” मलिंगाने एका यु-ट्यूब व्हिडीओमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं आहे.
आपल्या अनोख्या गोलंदाजी शैलीसाठी चर्चेत राहिलेल्या मलिंगाने अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं. आयपीएलमध्येही तो मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व करायच्या. मुंबईला आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ बनवण्यात मलिगांचाही मोलाचा वाटा होता.
३० कसोटी, २२६ वन-डे आणि ८४ टी-२० सामन्यांमध्ये मलिगांने श्रीलंकेचं प्रतिनिधीत्व केलं. कसोटी क्रिकेटमध्ये १०१, वन-डे क्रिकेटमध्ये ३३८ तर टी-२० क्रिकेटमध्ये १०७ विकेट मलिगांच्या नावावर आहेत. आपल्या साईड-आर्म बॉलिंगमुळे सुरुवातीच्या काळात लसिथ मलिंगाला खेळणं भल्याभल्या फलंदाजांना जमायचं नाही. मलिंगाचे यॉर्कर बॉल हे सर्वात कठीण मानले जायचे.