- २० एप्रिल, २५ एप्रिल आणि ३० एप्रिलला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल.
- ४८८० मेट्रीक टन, ५,६१९ मेट्रीक टन आणि ६,५९३ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा .
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली:देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर काही ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याने चिंता वाढली आहे.यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आढावा बैठक घेतली.
त्यांनी सध्याच्या ऑक्सिजन साठा, निर्मिती आणि पुरवठ्याची माहिती घेतली.यावेळी बैठकीला आरोग्य मंत्रालय, स्टील मंत्रालय, रस्ते आणि परिवहन मंत्रालयासह विविध विभागाचे मंत्री आणि अधिकारी सहभागी झाले होते.COVID-19: PM Modi suggests increasing oxygen production as per capacity of each plant, say officials
या बैठकीत देशातील ऑक्सिजन पुरवठा आणि ते पुरवण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या. वाढती मागणी पाहता ऑक्सिजन निर्मिती करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर स्टील प्लांटना देण्यात येण्याऱ्या अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा आरोग्य वापरासाठी करण्यास सांगितलं आहे.
देशात ऑक्सिजन पुरवठा करण्याऱ्या टँकर्सना सूट देण्यासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. कोणतीही अडवणूक न करता देशात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितलं आहे. ड्रायव्हरर्सनंही दोन शिफ्टमध्ये काम करत योग्य ठिकाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. सिलिंडर भरण्याऱ्या कंपन्यांनी २४ तास काम करण्याची तयारी ठेवावी अशी विनंतीही केली आहे. तसेच नायट्रोजन आणि अरगोन पुरवठा करण्याऱ्या टँकर्सनाही ऑक्सिजन पुरवठा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण परिस्थितीबाबत जाणून घेतलं. ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता होऊ नये यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. पुढचे १५ दिवस १२ राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडु, पंजाब, हरयाणा आणि राजस्थान ऑक्सिजन लागेल .
ऑक्सिजन टँकर्सना कोणतेही निर्बंध नाहीत
पंतप्रधानांनी कोरोनाने सर्वाधिक त्रस्त असलेल्या 12 राज्यांमध्ये पुढील 15 दिवस ऑक्सिजन पुरवठा कसा होईल याची माहिती घेतली. प्रत्येक ऑक्सिजन प्लांटची क्षमता वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या टँकर्सवर कोणतेही निर्बंध घालू नका, असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे.