• Download App
    देशात २४ तासांत कोरोनाचे ४४ हजार नवे रुग्ण; केरळ-महाराष्ट्रात ७९ टक्के बाधीत, टेन्शन वाढल Coronavirus updates India reports 44658 new cases increase in kerala and maharashtra again

    देशात २४ तासांत कोरोनाचे ४४ हजार नवे रुग्ण; केरळ-महाराष्ट्रात ७९ टक्के बाधीत, टेन्शन वाढल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील एकूण नव्या कोरोना बाधितांपैकी ३६ हजारांहून अधिक नवे रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रातून समोर आले आहेत. म्हणजेच देशातील ७९ टक्के नवे रुग्ण केवळ या दोन राज्यांतूनच समोर आले आहेत. Coronavirus updates India reports 44658 new cases increase in kerala and maharashtra again

    केरळ आणि महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. दोन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या २४ तासांत, देशात ४४ हजारांहून अधिक नवीन कोरोना बाधित समोर आले आहेत. तर ४९६ जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर ३२,९८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण नव्या कोरोना बाधितांपैकी ३६ हजारांहून अधिक नवे रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रातून आहेत. म्हणजेच देशातील ७९ टक्के नवे कोरोना रुग्ण या दोन राज्यांतूनच समोर आले आहेत.



    केरळमध्ये ३१ हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर १६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत, तर १५९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तीन लाख ४४ हजारांच्या पुढे गेली आहे. यातच, कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता असून ती नोव्हेंबरमध्ये पीकवर असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

    देशातील कोरोना स्थिती

    • गेल्या २४ तासांत नवीन कोरोना बाधित – ४४,६५८
    • गेल्या २४ तासांमधील बरे झालेले रुग्ण – ३२,९८८
    • गेल्या २४ तासांमधील एकूण मृत्यू – ४९६
    • गेल्या २४ तासांमधील लसीकरण – ७९.४८ लाख
    • देशात सक्रिय रुग्णांची संख्या – ३.४४लाख
    • एकूण संक्रमित लोक – ३.२६ कोटी
    • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण – ३.१८कोटी
    • आतापर्यंत एकूण मृत्यू – ४.३६ लाख
    • एकूण कोरोना लसीकरणाचा आकडा – ६१.२२ कोटी

    या पाच राज्यांत सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण –

    • केरळ-  ३१,६४५
    • महाराष्ट्र- ५१३१
    • आंध्र प्रदेश- १६२२
    • तमिळनाडू- १६०४
    • कर्नाटक- १२२४

    Coronavirus updates India reports 44658 new cases increase in kerala and maharashtra again

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…