विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अथक प्रयत्नाने तयार केलेल्या लाशींवर पाणी फिरणार का, मेहनत वाया जाणार का ,असे प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु सध्याची लस जुन्याबरोबरच नव्या कोरोनाच्या विषाणूवरही तितकीच रामबाण आहे, असा दावा भारत सरकारने केला आहे. Corona vaccines effective for even new covid strain
ब्रिटनमधून 29 डिसेंबर रोजी भारतात परतलेल्या 6 जणांमध्ये नवीन कोरोनाचे विषाणू आढळले होते. यामुळे सध्या तयार केलेल्या लशींचे काय होणार अशी भीती बाळगण्याचे कारण नाही, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.
“ब्रिटन किंवा दक्षिण आफ्रिकेतल्या कोविड -१ च्या रूपांपासून बचाव करण्यात सध्याची लस अपयशी ठरल्याचा पुरावा नाही, ”असे भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन म्हणाले.
Corona vaccines effective for even new covid strain
विजयराघवन त्यांनी स्पष्ट केले की, बहुतेक लसीद्वारे ज्या ठिकाणी बदल घडले आहेत तेथील स्पाइक प्रोटीनना लक्ष केले जाते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी संरक्षणात्मक प्रतिपिंडे तयार करण्यास लस उत्तेजन देते. त्यामुळे लस ही नवीन किंवा जुन्या कोरोना विषाणूवर तितकीच प्रभावी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.