“विजयाला सगळे धनी असतात, पण पराभवाला बाप नसतो!!”, ही पूर्वसुरींनी लिहून ठेवलेली म्हण खरीच आहे. याचा प्रत्यय काँग्रेसच्या गांधी परिवाराला सध्या येत आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला त्यानंतर काँग्रेसमधल्या गांधी परिवाराला उपदेश द्यायला “ऐरे गैरे नथ्थू खैरे” सगळेच पुढे आले आहेत. Congress’s withered bundha tree deciduous; However, Shiv Sena sat in the “cold shadow” … !!
उपदेशाच्या बांगड्या
ज्यांचे स्वतःचे राजकीय कर्तृत्व वैयक्तिक बळावर शून्यवत आहे, ते जी 23 गटातले नेते, ज्या काँग्रेसच्या इकोसिस्टीमच्या बळावर चरित्रे आणि इतिहास लिहून कोट्यवधींची कमाई करणारे सेलिब्रिटी चरित्रकार, इतकेच काय पण मित्रपक्ष असलेली शिवसेना देखील कॉंग्रेसच्या गांधी परिवाराच्या हातात उपदेशाच्या बांगड्या भरायला पुढे आली आहे…!! वास्तविक पाहता राणा भीमदेवी थाटात गर्जना करा शिवसेना देखील गोवा आणि उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीत ठरली होती पण त्यांना “नोटा”पेक्षाही कमी मते मिळाली. तेव्हा खरे म्हणजे त्यांनी स्वतःच्या पराभवाची मीमांसा करायला हवी होती. आत्मपरीक्षणाचा सल्ला स्वतःलाच द्यायला हवा होता. पण ते दिले सोडून, आता काँग्रेसजनांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला सामनाकरांनी काँग्रेसजनांना दिला आहे. गांधी परिवाराला दिला आहे. त्यांनी काँग्रेसचा सुकला बुंधा, वृक्ष निष्पर्ण!! अशा फुललेल्या ललित भाषेत गांधी परिवाराला, जी 23 गटातल्या नेतांना आणि एकूण काँग्रेसजनांना चिमटे काढले आहेत…!!
शिवसेना त्याच वृक्षाच्या सावलीला
पण नेहमी दुसर्याला उपदेश करणे सोपे असते. पण आपण तो अमलात आणणे कठीण असते हेच खरे. कारण “काँग्रेसचा सुकला बुंधा वृक्ष निष्पर्ण” असे म्हणणारे शिवसेनेचे सामनाकार त्याच शिवसेनेला घेऊन त्या सुकलेल्या बुंध्याच्या निष्पर्ण वृक्षाच्या सावलीत बसले आहेत… हे ते विसरले…!!
सामनाची हेडलाईन काय होती
1999 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला त्यावेळी सामनाची हेडलाईन होती, “येड्याच्या गां*वर उगवले बाभूळ, म्हणतो सावलीला बरे…!!” त्या वेळच्या सामनाकारांनी आपल्या पराभवावर केलेली ही आगपाखड होती. पण आजचे सामनाकार तेवढ्या क्षमतेचे उरलेले दिसत नाहीत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला जरूर “बुंधा सुकलेला वृक्ष निष्पर्ण” असे म्हणून घेतले असले तरी आपली शिवसेना आणि आपल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री त्याच वृक्षाच्या सावलीत खाली बसले आहेत आणि भाजपच्या यशाचा प्रखर सूर्य तळपत असताना देखील आपल्याला उकडतेय किंवा गरम होतंय असे न सांगता काँग्रेसच्या निष्पर्ण वृक्षच्या सावलीत “गारेगार” वाटत आहे, असे सांगत आहेत हे सामनाकार विसरले…!!
Congress’s withered bundha tree deciduous; However, Shiv Sena sat in the “cold shadow” … !!
महत्त्वाच्या बातम्या
- घरभाडे न भरणे हा गुन्हा नाही, कायदेशीर कारवाई मात्र नक्कीच ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
- मुस्लिम महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्याविरोधात निकाल, मेहबूबा मुफ्ती यांचा हिजाब निकालावर आरोप
- द काश्मीर फाईल्स निर्मितीला मराठी हातांचेही पाठबळ, विवेक अग्निहोत्रींना या व्यक्तीची प्रेरणा
- केजरीवालांची आता नवी खेळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरून दलितांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न